Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उस्माननगर परिसरात रमजान ईद  उत्साहात साजरी

उस्माननगर प्रतिनिधी - मुस्लिम धर्मात विशेष महत्त्व असलेल्या ईद-उल-फित्र म्हणजे रमजान ईद हा पवित्र सण उस्माननगर सह परिसरात मोठ्या उत्साहात साजरा क

राहुरी तहसीलवर मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा
सहा दिवसांत पाऊण कोटीची कर वसूली
अनोखा विवाह सोहळा; ‘सेवालया’ मधील एचआयव्ही संक्रमित पाच जोडप्यांचे शुभमंगल सावधान!

उस्माननगर प्रतिनिधी – मुस्लिम धर्मात विशेष महत्त्व असलेल्या ईद-उल-फित्र म्हणजे रमजान ईद हा पवित्र सण उस्माननगर सह परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
उस्मान नगर व परिसरातील मुस्लिम बांधवांनी मागील 30 दिवसापासून रोजा धरला होता. यामध्ये सकाळी लवकर उठून नमाज अदा केल्यापासून सायंकाळपर्यंत रोजच्या उपवास धरण्यात येतो. या पवित्र रमजान महिन्यांमध्ये यावर्षी लहानापासून थोरापर्यंत उपवास धरण्यात आला होता. ईद म्हणजे आनंदाचा दिवस रमजान महिन्याचा हा शेवटचा गोड समारंभ चंद्र दिसला की रमजान महिना संपला असे म्हणून दुसर्‍या दिवशी ईदगाच्या ठिकाणी किंवा मोठ्या मजीदीत लोक एकत्र येऊन ईद-उल-फित्र याची सामूहिक नमाज पडतात. प्रार्थना करतात गरीब श्रीमंतीचा भेदभाव विसरून सर्वजण एकाच रांगेत उभे राहून रमजान महिना उत्तम तर्‍हेने गेल्याबद्दल अल्लाहचे आभार मानतात.उस्मान नगर ते कलंबर रस्त्यावरील उत्तरेकडील माळ टेकडीवरील ईदगा मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. यावेळी सपोनि भारती ,तसेच तलाठी. यांच्यासह मुस्लिम बांधव , सामाजिक कार्यकर्ते , या परिसरातील नेते , एकमेकांना आलिंगन देऊन रमजान ईद मुबारक च्या शुभेच्छा देऊन उत्साहात साजरी करण्यात आली. नवीन कपडे घालून छोट्या मुलांची यावेळी लक्ष्मी उपस्थिती होती. परिसरात मुस्लिम बांधवांमध्ये नवचैतन्य वातावरण होते. सकाळच्या सहरी ते इप्तार पर्यंत उपवास धरला जातो.दि.22 रोजी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. या रमजान ईद व जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त दिनाचे औचित्य साधून मतदारसंघा मध्ये भावी उमेदवार म्हणून  कार्यकर्त्याच्या आग्रहाने भेटी दिल्या.यामुळे परिसरात निवडणूकीची धामधूम आहे की काय ? असा प्रश्न नागरिकांना पडला होता.

COMMENTS