अयोध्या ः अयोध्येतील राम मंदिर पहिल्याच पावसाने गळू लागले आहे. मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, ज्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान झाले,

अयोध्या ः अयोध्येतील राम मंदिर पहिल्याच पावसाने गळू लागले आहे. मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, ज्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान झाले, तेही पाण्याने भरले आहे. एक-दोन दिवसांत व्यवस्था न झाल्यास दर्शन आणि पूजेची व्यवस्था थांबवावी लागेल. सत्येंद्र दास यांनी सांगितले की, शनिवारी रात्री 2 ते 5 वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. त्यानंतर मंदिराच्या गाभार्यासमोरील मंडप 4 इंच पाण्याने भरला. मंदिरातील लोकांना विजेचा धक्का बसण्याची भीती होती. त्यामुळे पहाटे 4 वाजता होणारी आरती मशालीच्या उजेडात करावी लागली. सकाळी 6 ची आरतीही याच पद्धतीने झाली.
COMMENTS