राज्यात सत्तेसाठी दंगलीचा घाट : संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात सत्तेसाठी दंगलीचा घाट : संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

नाशिक/प्रतिनिधी : राज्यात भाजपला सत्ता मिळवता येत नसल्यामुळे राज्यात दंगली भडकाविण्याचे काम सुरू असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाश

राज्यपाल येता घरा…कोश्यारींच्या आजच्या दौर्‍यानिमित्त हिवरे बाजारमध्ये साफसफाई
पश्‍चिम बंगालमध्ये वंदे भारत रेल्वेवर दगडफेक
थरारक बिबट्याने जबड्यात धरले मुलाला…. | LOKNews24

नाशिक/प्रतिनिधी : राज्यात भाजपला सत्ता मिळवता येत नसल्यामुळे राज्यात दंगली भडकाविण्याचे काम सुरू असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केला. ते माध्यमांना संबोधित करतांना बोलत होते. राऊतांनी कोल्हापूर निवडणूक निकाल, हिंदुत्व आणि इतर मुद्द्यांवर पत्रकार पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. मे महिन्यात आदित्य ठाकरेंना आयोध्येला घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. याशिवाय, राज्यात दंगली भडकवण्याचे कट असल्याची गुप्तचर विभागाची माहिती असल्याचा दावा त्यांनी केला. सत्ता येत नाही म्हणून दंगलींचा घाट घालण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. राज्यात सत्ता मिळवता ये नसल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त झाली आहे. सत्ता मिळवायची आहे, पण आमदार फुटत नाही. म्हणून काही लोकांना सुपार्‍या दिल्या जात आहेत. राज्यात दंगली घडवायचा आणि राष्ट्पटी राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपला जनतेचे ठेंगा दाखवला
नाशिक ही प्रभू रामाची भूमी आहे. पण, काही लोक हनुमान चालिसा वाचायला पुण्यात गेले. काहींनी भाड्याने हिंदुत्व घेतले. हिंदुत्व कोणाला शिकवता. भाड्याने हिंदुत्व घेणार्‍यांनी आम्हाला शिकवू नये. आज कोल्हापूरचा निकाल लागला. या निवडणुकीला सुरुवात झाली, त्याच वेळी काही लोकांनी भोंगे हनिमान चालिसाचं घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. भोंग्यांचे राजकारण सुरु केले. पण, त्यांचा भोंगा वाजलाच नाही. जनतेने भाजपला ठेंगा दाखवला, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला.

COMMENTS