Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने राजूरीच्या पोलीस पाटलाचे निलंबन

फलटण / प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील मौजे राजुरी येथील पोलीस पाटलाच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर राजुरी

आयटी पार्क खोटच आहे म्हणूनच आमदारांनी किरण काळें समोर खुल्या चर्चेला येण्यापासून पळ काढला
त्रिपुडी येथील सोन्या नावाच्या चंद्रकोर बोकडाला 23 लाखाची बोली
गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण

फलटण / प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील मौजे राजुरी येथील पोलीस पाटलाच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर राजुरी गावचे पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव यास पोलीस पाटील पदावरून निलंबित करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी याप्रकरणी आदेश काढून निलंबन कार्यवाही केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील राजुरी गावचे पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव यांचे विरुध्द अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दि. 2 फेब्रुवारी रोजी 6:42 वाजता अटक करणत आली होती. त्यास दि. 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा सत्र न्यायालय सातारा येथे हजर केले असता त्यांना 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यानंतर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कलम 11 अन्वये उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी राजूरी पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव यास पोलीस पाटील पदावरून तात्काळ निलंबित करण्याचा आदेश दिले.

COMMENTS