भातकुडगाव फाटा प्रतिनिधी - राजीव बुक फेस्ट समारोप व जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ लेखक अर्थतज्ञ सिनेअभिनेते दीपक
भातकुडगाव फाटा प्रतिनिधी – राजीव बुक फेस्ट समारोप व जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ लेखक अर्थतज्ञ सिनेअभिनेते दीपक करंजीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला वाचनीय पुस्तकातून माणसाचे व्यक्तिमत्व घडत असते आपला मार्ग सत्य असावा दुसर्याचे शिव म्हणजे कल्याण करण्याची आपली धारणा असावी तरच आपले जीवन सुंदर होईल त्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे सोशल मीडियाच्या आभासीयुगात मोबाईल ऐवजी मुलांच्या हाती पुस्तक देणे हे शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हान आहे, शिक्षक पालकांनी साहित्याबद्दल मुलांना आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्या वेगवान घडामोडींचा योग्य अर्थ समजून घेण्यासाठी विविध संदर्भ साहित्यांचे वाचन केल्यास त्यातले खरे तथ्य आपल्याला समजते यासाठी आपण घातसूत्र हे पुस्तक वाचावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार मोनिकाताई राजळे होत्या यावेळी शिक्षण क्षेत्रातील लेखनीय कार्याबद्दल पद्मभूषण बाळासाहेब भारदे माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य एस व्ही कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मोनिकाताई राजळे म्हणाल्या राजीव राजळे मित्र मंडळाच्या माध्यमातून नगरसेवक महेश फलके व त्यांचे सहकारी चार वर्षापासून राजीव बुक फेस्ट हा कार्यक्रम घेत आहेत, याला शेवगावकरांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे, पुस्तक प्रदर्शनात दीड लाखापेक्षा जास्त विविध क्षेत्रातील उत्कृष्ट पुस्तके पुस्तक प्रेमीसाठी उपलब्ध होती. याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, उद्योजक व ज्येष्ठ लेखक शरद तांदळे, आजचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक व सिने अभिनेते दीपक करंजीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शेवगाव चे भूमिपुत्र व यशस्वी उद्योजक मंदार भारदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. साहित्य क्षेत्राच्या बाबतीत शेवगाव चा इतिहास मोठा आहे व वर्तमान परिस्थितीतही ग्रंथ प्रदर्शनाच्या प्रतिसादावरून वाचन संस्कृती येथे रुजली असल्याचे दिसून येते, विद्यार्थी नागरिकांना वाचनाची गोडी लागावी व वाचन संस्कृतीतून एक चांगला समाज घडावा याकरिता असेच पुस्तक प्रदर्शनाचे कार्यक्रम घडावेत असे प्रतिपादन आमदार राजळे यांनी केले. यावेळी उद्योजक लेखक मंदार भारदे, बापूसाहेब पाटेकर, बापूसाहेब भोसले, भाजपा तालुका अध्यक्ष ताराभाऊ लोढे, शहर महिला आघाडी अध्यक्ष उषाताई कंगनकर, नगरसेवक सागर फडके गणेश कोरडे ,संभाजी काटे, कचरू चोथे, महादेव पवार, केशव आंधळे मुसाभाई शेख, संदीप खरड, संदीप जावळे, डॉ नीरज लांडे, डॉ मल्हारी लवांडे, सरपंच दादासाहेब भुसारी, सोपानराव वडणे, सुरेशराव नेमाने, लक्ष्मण देवडे, राजेंद्र डमाळे, संदीप देशमुख, भाऊसाहेब मुरकुटे, अनिल परदेशी, अनंत उकिरडे, महादेव पाटेकर, आकाश साबळे, कैलास सोनवणे, गणेश गरड, अक्षय दातीर, विनोद शिंदे, बाळासाहेब झिरपे, आमोल पालवे, अनिल खैरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रस्ताविक महेश फलके यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले तर संदीप वाणी यांनी आभार मानले.
COMMENTS