Homeताज्या बातम्यादेश

मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत राजेंद्रसिंह गुडांचं शिवसेनेत प्रवेश

राजस्थान प्रतिनिधी - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत  यांच्या एकेकाळचे जवळचे सहकारी राजेंद्रसिंह गुढा यांनी आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प

विहीरीत पडलेल्या अस्वलला मिळाले जीवनदान
आमदार विखेंच्या बंगल्यात चोरी करण्याचा प्रयत्न
…तर, ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असतील!

राजस्थान प्रतिनिधी – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत  यांच्या एकेकाळचे जवळचे सहकारी राजेंद्रसिंह गुढा यांनी आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यासाठी मुख्य़मंत्री खास राजस्थानमध्ये गेले आहेत. राजस्थानच्या राजकारणात सध्या एका लाल डायरीची बरीच चर्चा आहे, या लाल डायरीत राजस्थान सरकारच्या कथित भ्रष्टाचाराचा संपूर्ण काळा चिठ्ठा आहे.  या डायरीमुळे मुळे मुख्यमंत्री गेहलोत यांची डोकेदुखी चांगलीच वाढलीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील यावरून गेलहोत यांच्यावर टीका केली होती. ही लाल डायरी गुढा यांच्याच हातात आहे गुढा यांनी मंत्री असताना जुलैमध्ये विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. विधानसभेत काँग्रेस आमदारांनी मणिपूर हिंसाचार आणि मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.  पण या मुद्द्यावर बोलताना राजेंद्रसिंह गुढा यांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला होता. बलात्काराच्या बाबतीत राजस्थान प्रथम आहे. मणिपूरबद्दल बोलण्यापूर्वी आपण स्वतःच्या घरात डोकावलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी गहलोत सरकारवरच ताशेरे ओढले होते. काँग्रेस आमदारानं आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केल्यानं काँग्रेसच्या विधानसभेत अस्वस्थता निर्माण झाली होती. हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी गुढा यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. पक्षाकडून बडतर्फ केल्यानंतर गुढा यांनी विधानसभेतच एक ‘लाल डायरी’ दाखवून आपल्याच पक्षाच्या सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला होता. 

COMMENTS