Homeताज्या बातम्याशहरं

इस्लामपूरच्या राजश्री पाटील हिने दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर ’किली मांजारो’ शिखरावर फडकविला तिरंगा

इस्लामपूर / प्रतिनिधी : सलग 18 तासांचा खडतर प्रवास करत इस्लामपूरच्या राजश्री पाटील यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर मानल्या जाणार्‍या ’किलीमांजारो’

सूर्यकुमार यादव कडून चाहत्याला खास गिफ्ट
बीसीसीआयचा  ऋषभ पंतच्या कमबॅकसाठी ग्रीन सिग्नल
अनुष्का कुंभार यांचा जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून सत्कार

इस्लामपूर / प्रतिनिधी : सलग 18 तासांचा खडतर प्रवास करत इस्लामपूरच्या राजश्री पाटील यांनी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर मानल्या जाणार्‍या ’किलीमांजारो’वर भारताचा ध्वज फडकवला आहे. उरू पिक टांझानिया असे नाव असलेल्या 5895 मीटर उंचीवर त्यांनी आपला तिरंगा फडकवला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी हा उपक्रम यशस्वी केला. 14 ऑगस्टला चढाई करून 15 ऑगस्टला सकाळी 8 वाजता त्यांनी हा तिरंगा फडकवला.
राजश्री जाधव-पाटील यांचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील कापूसखेड आहे. त्या सध्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे नियंत्रक पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा हा त्यांचा मूळ विभाग असून मे 2022 मध्ये त्या प्रतिनियुक्तीवर पदोन्नतीने कृषी विद्यापीठात दापोली येथे नियुक्ती झाल्या आहेत. 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सन 2022 हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष याचेही औचित्य साधून विद्यापीठाचा देखील झेंडा दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो वर त्यांनी फडकवला आहे. गेल्या महिन्यात त्यांनी हिमालयातील कांगस्त्ये शिखर सर करावयाच्या मोहिमेत भाग घेतला होता. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना पाच हजार मीटर उंचीवरून शिखर सर न करताच परत फिरावे लागले होते. यापूर्वी त्यांनी हिमालयातील 4200 मीटर उंचीचे पतालसू हे शिखर सर केले आहे.
अटलबिहारी वाजपेयी माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूटमधून त्यांनी बेसिक माउंटेनियरिंगचा कोर्स केला आहे. सह्याद्री रांगामध्ये एकूण पाच वेळा महाराष्ट्राचे सर्वोच्च असे कळसूबाई हे शिखर सर केले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रशासनमधील जवळपास 150 महिला अधिकारी यांना घेऊन या मोहिमा त्यांनी पूर्ण केल्या आहेत. तसेच चढाईस कठीण मानला जाणारा लिंगाना हा किल्ला त्यांनी सर केला आहे. याचबरोबर त्यांनी सह्याद्रीमध्ये रायगड प्रदक्षिणा, पन्हाळा पावनखिंड हा 46 किमीचा ट्रेक तसेच पन्हाळा पावनखिंड विशाळगड हा 63 किमीचा ट्रेक सलग केला आहे. याचबरोबर सह्याद्रीमधील राजगड, तोरणा, प्रतापगड असे गडकिल्ले अनेकवेळा सर केले आहेत. त्यांना कोकण विद्यापीठाचे कुलगुरू संदीप सावंत, राजर्षी शाहू अ‍ॅकॅडमीचे संस्थापक डॉ. विक्रांत पाटील, संदीप नाझरे, वैभव राजे-घाडगे, आई-वडील यांनी प्रोत्साहन दिले.
किलीमांजारोवर निश्‍चितस्थळी पोचल्यावर आपला तिरंगा फडकवताना अभिमान वाटला. राष्ट्रगीत म्हणून सूर्यनमस्कारही घातला. आजवर मी ज्या-ज्या ठिकाणी गेले आहे. त्या प्रत्येक ठिकाणी सूर्यनमस्कार घातला आहे. चांगल्या आरोग्याचा संदेश म्हणून मी जिथे-जिथे संधी मिळेल तिथे सूर्यनमस्कार घालण्याविषयी बोलत असते. एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न आहे आणि तिथेही पोचल्यानंतर मी सूर्यनमस्कार घालेन.
राजश्री पाटील ( बाळासाहेब सावंत, नियंत्रक कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

COMMENTS