Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजर्षी शाहू महाराज सामाजिक समतेचे पुरस्कर्ते; सौ.मंजुश्रीताई मुरकुटे

श्रीरामपूर - राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कार्य हे ऐतिहासिक असेच होते. विसाव्या शतकात जेव्हा जातीयवादाचा पगडा होता त्याकाळात शाहू महाराजांनी सा

पीएसआय झालेल्या अजय कळसकर यांचा सन्मान
नाटेगावातील शेतकर्‍यांचे उपोषण मागे
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत न दिल्यास आंदोलन छेडणार

श्रीरामपूर – राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कार्य हे ऐतिहासिक असेच होते. विसाव्या शतकात जेव्हा जातीयवादाचा पगडा होता त्याकाळात शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला, असे प्रतिपादन अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी केले. लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने श्रीरामपूर येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाहू महाराज यांचे प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सौ.मुरकुटे पुढे म्हणाल्या की, शाहू महाराज जाती व्यवस्थेविरुद्ध ठामपणे उभे राहिले. त्यांनी मागासवर्गीयांना आरक्षण दिले. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेकांना त्यांनी शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले. शिक्षणाला त्यांनी प्राथमिकता दिली. जे पालक मुलांना शाळेत घालणार नाहित त्यांना आर्थिक दंड करण्याची तरतूद त्यांनी केली. राजर्षी शाहू महाराज हेच ख-या अर्थाने सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते, असे त्या म्हणाल्या.

          या कार्यक्रमास अशोक बँकेचे चेअरमन अ‍ॅड्.सुभाष चौधरी, लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, रोहन डावखर, अ‍ॅड्.पृथ्वीराज चव्हाण, संजय लबडे, नानासाहेब गांगड, संदीप डावखर, नवाब सय्यद, प्रमोद करंडे, वैभव सुरडकर, कैलास भागवत, इम्रान शेख, पंकज देवकर आदी उपस्थित होते.

COMMENTS