इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील कुस्ती केंद्राचा मल्ल तेजस बबनराव पाटील (सुरूल) याने अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केस

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील कुस्ती केंद्राचा मल्ल तेजस बबनराव पाटील (सुरूल) याने अहिल्यानगर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजन गटात माती विभागात रौप्य पदक पटकाविले आहे. माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी पै. तेजस याचा सत्कार करून त्याचे अभिनंदन करून त्यास शुभेच्छा दिल्या. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांच्यासह संचालक व अधिकार्यांनी पै. तेजस याचे अभिनंदन केले.
याप्रसंगी बोरगावचे माजी सरपंच पै. विनायक पाटील, कुस्ती प्रशिक्षक पै. कुंडलिक गायकवाड, पै. नितीन सलगर प्रामुख्याने उपस्थित होते. पै. तेजस हा राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या राजारामबापू कुस्ती केंद्राचा मानधनधारक मल्ल आहे. तो राजारामबापू कुस्ती केंद्रात काही वर्षापासून कुस्तीचा सराव करत असून त्यास कुस्ती प्रशिक्षक पै. कुंडलिक गायकवाड, पै. नितीन सलगर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. पै. तेजस हा कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात शास्त्र शाखेत तिसर्या वर्गात शिकत आहे.
COMMENTS