Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये राज ठाकरे यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ फलक

नाशिक प्रतिनिधी - मनसेच्या १८ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने पक्षाने अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘भावी मुख्यमंत्री‘ म्हणून उल्लेख करत रा

अक्षय कुमारला मिळालं भारतीय नागरिकत्व
पारनेरच्या पत्रकाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल
जेलमधून पाच जणांचे पलायन, तिघांना पकडण्यात यश

नाशिक प्रतिनिधी – मनसेच्या १८ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने पक्षाने अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘भावी मुख्यमंत्री‘ म्हणून उल्लेख करत राज्याच्या राजकारणात पुन्हा आपली पकड मजबूत करण्याची धडपड चालवली आहे. राज यांच्या स्वागतासाठी पाथर्डी फाटा परिसर भगवामय करण्यात आला आहे. दौऱ्यात राज हे पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात आरती आणि मुंबई नाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या दोन्ही परिसरासह प्रमुख रस्ते, चौक स्वागत फलकांनी भरून गेले आहेत. दुसरीकडे शहर, ग्रामीण भागातील रस्त्यांवर सत्ताधारी भाजपने ‘अब की बार मोदी सरकार’ अशा भिंती रंगवत प्रचाराला सुरुवात केली असून त्यास काँग्रेसने ’अब की बार रोजगार दो‘ अशा भिंती रंगवून प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून नाशिक लोकसभेची जागा नेमकी कुणाच्या पदरात पडणार, याची स्पष्टता झालेली नाही. मनसेही महायुतीत सहभागी होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गटाने श्रीराम भूमी नाशिकमधून प्रचाराचे रणशिंग याआधीच फुंकले आहे. मनसेकडून काहिसे तसेच अनुकरण होत आहे. या दौऱ्यात राज ठाकरे हे शुक्रवारी सकाळी पंचवटीतील श्रीकाळाराम मंदिरात आरती करणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात ते संवाद साधतील. वर्धापन दिन सोहळ्यातून मनसेने जोरदार शक्ती प्रदर्शनाचे नियोजन केले आहे. राज यांची प्रतिमा भावी मुख्यमंत्री म्हणून जनतेसमोर नेण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. गुरुवारी सायंकाळी राज यांचे शहरात आगमन होणार आहे. पाथर्डी फाटा येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. हा संपूर्ण परिसर भगवामय करण्यात आला आहे. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले जाईल. या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांची भव्य प्रतिमा असणारा फलक उभारला गेला आहे. महाराष्ट्राची ब्लू प्रिंट समोर आणणारे राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत. राज्याचा विकास ते करू शकतील. जनतेच्या मनातील ते मुख्यमंत्री आहेत. त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जिवाचे रान केले जाईल, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

COMMENTS