Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदेंना पुन्हा भेटेन, काय चर्चा करायच्या त्या करा ः राज ठाकरे

मुंबई ः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीभोवती रंगलेल्या राजकीय चर्चांवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. मुं

बा..विठ्ठला सर्वांना सुखी, समृद्ध कर
शिंदेंचे नगरसेवक ताज लँड्स एंडमध्ये एकत्र
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई ः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीभोवती रंगलेल्या राजकीय चर्चांवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईसह विविध शहरांतील वाढत्या नागरी प्रश्‍नांच्या पार्श्‍वभूमीवरच ही भेट घेतल्याचे त्यांनी सांगत, मी त्यांना पुन्हा भेटेन; कुणाला काय चर्चा करायच्या असतील त्या करा, असा टोला संशय घेणार्‍यांना शुक्रवारी लगावला.
गुरुवारी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्कांना उधाण आले. काही विरोधकांनी या भेटीतून भविष्यातील राजकीय समीकरणे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र राज ठाकरे यांनी या सर्व अटकळी फेटाळून लावत, निवडणुका आत्ताच पार पडल्या आहेत आणि पुढील निवडणुकांना अजून अवधी आहे, अशा परिस्थितीत प्रत्येक भेटीत राजकारण शोधणे चुकीचे असल्याचे नमूद केले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, सत्तेत असलेल्या व्यक्तींना शहरांच्या प्रश्‍नांबाबत सूचना देणे किंवा चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी संवाद साधणे यात गैर काहीच नाही. आज ते सत्तेत आहेत. आम्हाला काही मुद्दे मांडायचे असतील, तर त्यांना भेटणे स्वाभाविक आहे. उद्या गरज भासली तर मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांनी सध्या मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांतील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले.
पुनर्विकासाच्या वाढत्या प्रकल्पांमुळे एका ठिकाणी राहणार्‍या लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. पूर्वी 40-50 जण राहत असलेल्या जागी आज 300-400 लोक राहतात, मात्र रस्ते आणि मोकळी जागा तशीच आहे. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून पार्किंगची सोय अपुरी पडत आहे. परिणामी रस्त्यांवरच वाहने उभी राहत असून वाहतूक कोंडी तीव्र होत आहे. वाहननोंदणीच्या वाढत्या आकडेवारीकडेही त्यांनी लक्ष वेधले. शहरात येणार्‍या नव्या गाड्या आणि लोकसंख्येचा ओघ थांबवण्याचा किंवा नियंत्रित करण्याचा कोणताही ठोस आराखडा दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शहरांना शिस्त लागली पाहिजे. नियमांची कडक अंमलबजावणी झाली नाही, तर परिस्थिती आणखी बिकट होईल, असे ते म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी हे मुद्दे मांडल्याचे सांगितले. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजकीय अर्थ लावण्यापेक्षा शहरांच्या प्रश्‍नांवर गंभीर चर्चा होणे अधिक गरजेचे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

COMMENTS