Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून राज ठाकरे आक्रमक

मुंबई ः पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांचा बहुचर्चित पाकिस्तानी चित्रपट ’द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर रोजी भा

राणेंच्या अटकेचे आदेश काढणारे पोलीस अधिकारी गेले राज ठाकरेंच्या भेटीला… म्हणाले…
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा कर्नाटकात परिणाम दिसला : राज ठाकरे
निवडणुकीत नाक्यावर सभा घेणारी ही लोकं – राज ठाकरे यांचा आशिष शेलार यांना टोला  

मुंबई ः पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांचा बहुचर्चित पाकिस्तानी चित्रपट ’द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत जाहीर विरोध केला आहे. त्यामुळे हा चित्रपट आता प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे.
राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हणाले, फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ’लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे राज ठाकरे म्हणाले, कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळे इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणे, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणे हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे. अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचे हा त्यांचा प्रश्‍न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की. राज ठाकरे म्हणाले, या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका, असे म्हणत सौम्य भाषेत इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे. हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलिस महासंचालकांची पण नसणार, उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे, असे राज ठाकरे म्हणाले. वेळीच पाऊले उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावे. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणार्‍या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये, अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे, असे राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणले आहे.

COMMENTS