मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सांगलीच्या शिराळा येथील खटल्यातून त्यांना दोष मुक्त करण्यात आ

मुंबई ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सांगलीच्या शिराळा येथील खटल्यातून त्यांना दोष मुक्त करण्यात आले आहे. इस्लामपूर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यांचे नाव या खटल्यातून वगळ्यात आले आहे. 2008 मध्ये शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी या ठिकाणी रेल्वे भरती प्रकरणी मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलना दरम्यान हिंसक प्रकार घडला होता. याप्रकरणी कोकरूड पोलिस ठाण्यामध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह राज ठाकरेंच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला होता.
COMMENTS