Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापूर रेल्वे विभागात राजभाषा हिंदी कार्यान्वयन समितीची बैठक उत्साहात

सोलापूर ः मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या राजभाषा कार्यान्वयन समितीची 97 वी त्रैमासिक बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या

इंदापूर तालुक्यात निवडणुकीनंतर गोळीबार
अहमदाबाद-तिरुचिरापल्ली साप्ताहिक विशेष रेल्वे
राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

सोलापूर ः मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या राजभाषा कार्यान्वयन समितीची 97 वी त्रैमासिक बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी विभागाची ’संदेश’ या राजभाषेतील त्रैमासिक ई-सूचना पत्र अंक-16 चे प्रकाशन करण्यात आले, पत्रिकेत सर्व विभागांकडून मिळालेल्या विशेष उपलब्ध माहिती छायाचित्रांसह प्रकाशित करण्यात आली.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीच्या या युगात लोकांपर्यंत माहिती त्वरित पोहोचवण्यासाठी ई-सूचना पत्र हे योग्य माध्यम आहे. या त्रैमासिकाच्या यशस्वी प्रकाशनाबद्दल त्यांनी राजभाषा विभागाच्या सर्व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. तसेच विभागातील राजभाषा हिंदीचा वापर व प्रसार करण्याबाबतही त्यांनी कौतुक केले आणि सर्व अधिकार्‍यांनी कार्यालयीन कामकाजात राजभाषा हिंदीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले संविधानानुसार हिंदी ही आपली राजभाषा असून ती आपल्या दैनंदिन कामात वापरणे ही आपली घटनात्मक जबाबदारी आहे. बैठकीदरम्यान, हिंदी व्हॉईस टायपिंग लाईव्ह डेमो राजभाषा विभागाचे वरिष्ठ अनुवादक मुश्ताक शेख यांनी दिले. बैठकीत सर्व शाखाधिकारी, अधिकारी, मुख्य कार्यालय अधिक्षक-कार्यालय अधिक्षक आणि स्टेशन राजभाषा कार्यान्वयन समितीचे अध्यक्ष-सदस्य-सचिव उपस्थित होते. बैठकीचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक कार्मिक अधिकारी तथा संपर्क राजभाषा अधिकारी एस.एल.खोत यांनी केले. ही बैठक यशस्वी करण्यासाठी राजभाषा विभागाचे व्ही.बी. काडगे, मुश्ताक शेख, राजीव वलिवकर, शिव साहब यादव, किरण माने यांनी आपले मोलाचे योगदान दिले.

COMMENTS