Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरारमध्ये गुजराती समाजाच्या कार्यक्रमात नोटांचा पाऊस

गुजराती समाजाच्या कार्यक्रमात नोटांचा पाऊस पडला आहे. विरारमध्ये एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमात पैशांची उधळण करण्यात आली. या कार्यक्रमाचा व्हिड

धुळ्यात बारा-बलुतेदार महासंघाची 20 मार्चला बैठक
ईडीची राज्यभरात छापेमारी
जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीत संगमनेर तालुका जिल्ह्यात प्रथम

गुजराती समाजाच्या कार्यक्रमात नोटांचा पाऊस पडला आहे. विरारमध्ये एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमात पैशांची उधळण करण्यात आली. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओ मध्ये स्टेजवर नोटांचा खच पहायला मिळत आहे. तर, स्टेजच्या खाली एक व्यक्ती टोपली घेवून या नोटा टोपलीत गोळा करताना व्हिडिओत दिसत आहे.  विरार पूर्व परिसरात सकवार येथे गुजराती समाजातर्फे एका संगीत जलासा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नोटांची उधळण करण्यात आली आहे. ही सर्व दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. नोटा उधळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  4 मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक श्रोते गायक आणि एकमेकांवर नोटांचा वर्षाव करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. गुजराती समाजाकडून आयोजन करण्यात येत असलेल्या अशा कार्यक्रमात यापूर्वी देखिल नोटा उधळत असल्याचे प्रकार घडले होते. या कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी दिली की नाही याबाबत कोणताही खुलासा होऊ शकला नाही

COMMENTS