Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठवाड्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज

पुणे ः बांगलादेश आणि आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून या आठवड्यात ढगां

शेतमालावरील वायदे बाजार बंदी तातडीने हटवावी…स्वतंत्र भारत पक्षाचा सत्याग्रह इशारा
आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश
सिंघम अगेन’च्या शूटिंगदरम्यान अजय देवगण जखमी

पुणे ः बांगलादेश आणि आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून या आठवड्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाड्यात मागील आठवड्यात रिमझिम हलका पाऊस झाल्याने धरण साठ्यात फार वाढ झाली नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू झाला.  
पुढील पाच दिवस मराठवाड्यात सर्वदूर पाऊस राहण्याचा अंदाज देण्यात आला. पुढील दोन दिवस मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होणार असून त्यानंतर दोन दिवस पावसाची विश्रांती असेल व त्यानंतर पुन्हा एकदा सर्व दूर पाऊस होण्याची शक्यता आहे, असे प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवले. मराठवाड्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ओढे नाले ओसंडून वाहत असून धरण साठ्यातही वाढ होत आहे. दरम्यान पुढील तीन दिवस लातूर नांदेड व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी तुरळक असा अंदाज वर्तवण्यात आला. या तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असला तरी पुढील चार दिवस कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.  हवामान विभागाने मंगळवारी मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. लातूर हिंगोली नांदेड हे तीन जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तसेच वादळी वार्‍याचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज छत्रपती संभाजी नगर जालना परभणी धाराशिव जिल्ह्यात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी वार्‍याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहणार असून तुरळक ठिकाणी वीरांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

COMMENTS