Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटण-लोणंद लोहमार्गावरील रेल्वेसेवा आजपासून पुन्हा सुरु

फलटण / प्रतिनिधी : कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वे प्रशासनाने बंद केलेली रेल्वे सेवा पुन्हा सुरु होत असून फलटण- लोणंद आणि फलटण पुणे मार्गा

म्हसवड शहरात दहा दिवसांतून एकदा पाणी; म्हसवड नगरपरिषदे विरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राज्यमंत्रीही घेणार शपथ
देहदानाचा निर्णय समाजास दिशादर्शक राहील

फलटण / प्रतिनिधी : कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वे प्रशासनाने बंद केलेली रेल्वे सेवा पुन्हा सुरु होत असून फलटण- लोणंद आणि फलटण पुणे मार्गावर दिनांक 10 फेब्रुवारी पासून रेल्वे सेवा सुरु होत आहे.
फलटण-लोणंद मार्गावरील सेवा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने पुणे फलटण व लोणंद-फलटण दरम्यान डेमू (ऊळशीशश्र एश्रशलीींळज्ञ चरश्रींळरिश्र णपळीं ) रेल्वे सेवा गुरुवार, दि. 10 फेब्रुवारीपासून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फलटण-पुणे व फलटण-लोणंद मार्गावर रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. फलटण-पुणे मार्गावर गाडी क्रमांक 01535 पुणे येथून पहाटे 5.50 वाजता सुटेल व सकाळी 9.35 वाजता फलटणला पोहोचेल तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01536 फलटण येथून सायंकाळी 6.00 वाजता सुटेल व पुणे येथे रात्री 9.35 वाजता पोहोचेल.
ही गाडी सासवड रोड, जेजूरी, नीरा, लोणंद व सुरवडी स्टेशनवर थांबेल. गाडी क्रमांक 01538 फलटण येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल व 12.20 वाजता लोणंदला पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01537 लोणंद येथून दुपारी 3.00 वाजता सुटेल व फलटण येथे 4.20 वाजता पोहोचेल. ही गाडी सुरवडी स्टेशनवर थांबेल. 10 कोच असलेल्या या दोन्ही डेमू (ऊळशीशश्र एश्रशलीींळज्ञ चरश्रींळरिश्र णपळीं) गाड्या रविवार व्यतिरिक्त प्रतिदिन सेवेत असतील.10 कोच असलेल्या या दोन्ही डेमू (ऊळशीशश्र एश्रशलीींळज्ञ चरश्रींळरिश्र णपळीं) गाड्या रविवार व्यतिरिक्त प्रतिदिन सेवेत असतील. प्रवाशांनी कोरोना महामारीमुळे रेल्वे प्रवासाकरीता जारी मार्गदर्शक सूचना, जसे प्रवासा दरम्यान मास्क वापरणे, सोशल डिस्टेंसिंग, सॅनिटायझर वापर आदींचे पालन करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे दरम्यान फलटण-लोणंद रेल्वे प्रवासासाठी प्रति व्यक्ती 30 रुपये आणि फलटण-पुणे प्रवासासाठी प्रति व्यक्ती 60 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

COMMENTS