Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात 200 झोपड्यांवर रेल्वेचा हातोडा

पुणे : रेल्वेच्या जागांवर अतिक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रेल्वेला भविष्यात नवीन प्रकल्प राबविताना यामुळे अनेक अडचणी येतात. या पार्श्‍वभूमी

सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी अटकेत
घराणेशाहीची संस्थाने सत्तास्थानापासून खालसा करण्यासाठी डिच्चू कावा प्रभावी
इब्राहम खानचा बाप कोण आहे हे नवाब मलिक यांनी सांगावे – नितीन चौगुले (Video)

पुणे : रेल्वेच्या जागांवर अतिक्रमण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रेल्वेला भविष्यात नवीन प्रकल्प राबविताना यामुळे अनेक अडचणी येतात. या पार्श्‍वभूमीवर रेल्वेने आता अतिक्रमणविरोधी धडक कारवाई सुरू केली आहे. शिवाजीनगर ते खडकी रेल्वे स्थानकांदरम्यानच्या अतिक्रमणांवर रेल्वेने हातोडा मारला आहे. शिवाजीनगर ते खडकी स्थानकांदरम्यान रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. या ठिकाणी नागरिकांनी झोपड्या उभारल्या होत्या. रेल्वेने हे अतिक्रमण हटवण्यासाठी धडक कारवाई केली. या कारवाईत रेल्वेचा अभियांत्रिकी विभाग, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिस दल आणि स्थानक पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश होता. रेल्वेचे 50 गँगमन, रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिस आणि स्थानिक पोलिसांच्या 30 कर्मचार्‍यांनी चार जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने ही कारवाई केली. शिवाजीनगर ते खडकी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या सुमारे 150 ते 200 झोपड्या हटवण्यात आल्या. यातून रेल्वेने अतिक्रमण झालेली 550ु20 मीटर जागा पुन्हा ताब्यात घेतली आहे. या जागेचे बाजारमूल्य सुमारे पाच कोटी रुपये आहे. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी यापुढेही सातत्याने अतिक्रमण कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.

COMMENTS