मुंबई ः शिक्षकांसह इतर शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी जुन्या पेन्शनसाठी लढा उभारला असतांना आता या लढ्यात रेल्वे कर्मचार्यांनी उडी घेतली आहे. जुनी पे

मुंबई ः शिक्षकांसह इतर शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी जुन्या पेन्शनसाठी लढा उभारला असतांना आता या लढ्यात रेल्वे कर्मचार्यांनी उडी घेतली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी रेल्वे कर्मचार्यांनी 1 मेपासून बेमुदत संप करण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशभरातील रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सरकारकडे आम्ही नव्या ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली आहे. पण सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आमच्यापुढे संप करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. या प्रकरणी रेल्वे कर्मचार्यांसह एक कामगार संघटना एकजूट झाल्या आहेत. या सर्वांनी 1 मेपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या प्रकरणी या संघटना येत्या 19 मार्चपासून रेल्वे मंत्रालयाला आपले निवेदन पाठवतील. या संपामुळे रेल्वे सेवा ठप्पही होऊ शकते, अशी माहिती संयुक्त फोरमचे संयोजक गोपाल मिश्रा यांनी दिली आहे. आंदोलक कर्मचार्यांनी आपल्या मागण्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडेही पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे.
COMMENTS