Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये कत्तल खान्यावर छापा

सुमारे सात लाखाचा मुद्देमाल जप्त

संगमनेर ः गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाने शहरातील एका कत्तलखान्यावर बुधवारी कारवाई केली. या कारवाईत गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल

निकालाने ते खालच्या पायरीवर आले ः आ.प्रा. राम शिंदे
मोहटादेवीचे दर्शन घेऊन परतणारे 2 भाविक जागीच ठार
खिर्डी गणेशमध्ये बिबट्याचा संचार

संगमनेर ः गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाने शहरातील एका कत्तलखान्यावर बुधवारी कारवाई केली. या कारवाईत गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याचे पोलिसांना आढळून आले. तब्बल तीन हजार किलो गोवंश जनावरांच्या कत्तल केलेल्या मांसासह सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना सुरू होता ती पत्र्याची शेड नेस्तनाबूत करण्यात आली आहे.
पोलिसांच्या शेकडो कारवायानंतर देखील सुरू संगमनेर मधील कत्तलखाने सुरूच असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कत्तलखाने बंद करण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त देखील तैनात केला असताना पोलिसांची नजर चुकवून हे कत्तलखाने चोरी चुपके सुरू असल्याचे दिसते. संधी मिळताच अवघ्या तास-दोन तासाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल होते. गुरुवारी पहाटे जमजम कॉलनी येथील कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच गस्तीवर असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक शिरीष वमने, आरटीपीसी पोलिस नाईक अनिल कडलक व शामराव सुखदेव असे यांना देत छापा मारण्यास सांगितले. या पथकाने शहर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुनील माळी व विठ्ठल पवार यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व अन्य पोलिस कर्मचार्‍यांना सोबत घेत पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जमजम कॉलनीत माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे एमएच 04 एडब्लू 3164 या ओमनी कारमध्ये 1100 किलो गोवंश जनावरांचे कत्तल केलेले गोमांस आढळून आले. पोलिस पथकाने छापा टाकल्याचे दिसतात ओमनी कार चालक, जवळच्या पत्र्याच्या शेडचा मालक, जागा मालक पळून गेले. कारवाईदरम्यान पोलीस पथकाला सरकार लॉन्स जवळील एका निळ्या रंगाच्या पत्र्याच्या शेडमध्ये चार लाख रुपये किमतीचे गोवंश जनावराचे कत्तल केलेले गोमांस आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत ओमनी कारसह एकूण 6 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक शामराव हासे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नवाज कुरेशी, जब्बार पटेल, वाहिद कुरेशी (तिघेही रा. संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या तिघा जणांविरोधात भारतीय दंड विधान कलम 269, 429 सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1955 चे कलम 5(क), 9(अ) प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलिस

COMMENTS