संगमनेर प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील नासिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटालगत पोखरी बाळेश्वर शिवारामध्ये सुरू असलेल्या अवैध कुंटनखान्यावर
संगमनेर प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील नासिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटालगत पोखरी बाळेश्वर शिवारामध्ये सुरू असलेल्या अवैध कुंटनखान्यावर श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने कारवाई करत काल गुरुवारी पहाटेच्या वेळी छापा टाकला. कारवाईत पथकाने एका महिलेला ताब्यात घेत दोन परप्रांतीय पीडित मुलींची सुटका केली आहे.
संगमनेर शहरातील लॉजसह अन्य काही ठिकाणी चालणारे अनैतिक धंदे सर्वश्रुत असले तरी तालुक्यातील ग्रामीण भागातही आता अशा प्रकारचे व्यवसाय सुरू झाले असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलमान्वये या पीडित मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलीस नाईक मनोज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ, महिला पोलीस कॉन्स्टेबल मंगल जाधव यांनी केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
COMMENTS