लातूर प्रतिनिधी - रेणापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध तिर्रट जुगारावर सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी छापेमारी करीत 2 लाख 9 हजार रुपयांचा
लातूर प्रतिनिधी – रेणापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध तिर्रट जुगारावर सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी छापेमारी करीत 2 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 14 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशावर तिर्रट जुगार खेळत असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाल्याने पथकाने रेणापूर तालुक्यातील खरोळा शिवारात एका शेतातील लिंबाच्या झाडाखाली छापेमारी करून बेकायेशीररित्या जुगार खेळत व खेळवीत असताना 14 जण सापडले. या कारवाईत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 2 लाख 9 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या वेळी भागवत प्रल्हाद आडतराव, प्रकाश रामराव देशमुख, हणमंत साहेबराव राऊतराव, सचिन लक्ष्मण आडतराव, अनंत गोपीनाथ घोडके, रघुनाथ रामचंद्र घोडके, रमेश धनू जाधव, महेश दिलीप भोपी, नागनाथ दगडू उपाडे, सलीम मेहमुद सय्यद, गणेश बळीराम राठोड, संजय पांडुरंग शिंदे, वसंत रामा लोहार, उत्तम जगन्नाथ पवार यांच्यावर रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणा-यांवर मोठ्या प्रमाणावर धाडी मारून कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून रेणापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास रेणापूरचे पोलिस करीत आहेत.
COMMENTS