नवी मुंबई : शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत आहेत. त्यात अनेक वेळा एखाद्या उच्च पदावरील व्यक्तींची नावे सांगून किंवा आपणच ती व्यक्ती
नवी मुंबई : शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत आहेत. त्यात अनेक वेळा एखाद्या उच्च पदावरील व्यक्तींची नावे सांगून किंवा आपणच ती व्यक्ती असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक केली जाते. अशीच एक घटना ऐरोलीमध्ये राहणार्या एका सेवानिवृत्त अधिकार्यांसोबत घडली आहे. सिनेमे पाहतो त्यात ज्या घटना घडतात अगदी अशाच प्रकारची लूटमार या घटनेत केल्याचे समोर आले आहे. एका सहाजणांच्या टोळीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणजेच एसीबीचे अधिकारी असल्याचे भासवून लुटमार केल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील एका सेवानिवृत्त अधिकार्याच्या घराची झडती घेण्याच्या निमित्ताने त्याच्याच घरातील रोख रक्कम दागिने आणि अजूनही काही वस्तू लुटल्याचे समोर आले आहे. 34 लाख 85 हजार रुपये किमतीचा ऐवज लुटला असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेबाबत रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून रबाळे पोलीस अधिक तपास करत आहेत.
नवी मुंबई शहरामध्ये राहणार्या एका सेवानिवृत्त अधिकार्याच्या घरात सहाजणांनी तोतया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन दीड तासात 34 लाख 85 हजार रुपये लुटण्याची घटना घडली. ही घटना नवी मुंबईतील ऐरोली येथे घडली आहे. ही घटना 21 जुलैला घडली असली तरी सोमवारी याबाबतची तक्रार पिडीत सेवानिवृत्त अधिकार्याने पोलिसांना दिली. याबाबत नवी मुंबईचे पोलीस तपास करत आहेत.
नवी मुंबईतील ऐरोली नोडमधील सेक्टर 6 येथील साईराज इमारतीमध्ये कांतिलाल यादव यांच्या घरात ही घटना 21 जुलैला दुपारी साडेतीन ते पाच वाजता घडली. सहाजणांनी घरात येऊन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस असून घरझडती घ्यायची असल्याचे सांगून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा 34 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन तेथून पसार झाले.
ऐरोली मध्ये घडलेल्या ह्या घटनेने आजूबाजूच्या परिसरातील नागरिक सावध झाले आहेत. कारण अनेक सराईत चोरटे हे अशा प्रकारची बतावणी करून लूटमार करत असतात. अशा प्रकारच्या अनेक घटना या अगोदरही नवी मुंबईमध्ये घडलेल्या आहेत. नवी मुंबई मधील ऐरोलीमध्ये घडलेल्या ह्या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
COMMENTS