Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल जगताप सत्तेच्या आमिषाला बळी पडले नाही

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले कौतुक

श्रीगोंदा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील मोठ्या नेत्यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने श्रीगोंद्याच्या मातीत हजेरी लावली, यावेळी खासदा

आम्हाला काम द्या…नाहीतर आर्थिक मदत द्या ; विडी कामगारांची प्रशासनाकडे मागणी
ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांची वेळेत निर्मिती आणि साठवणूक करण्यास प्राधान्य : मुश्रीफ
जमीन लिहून घेणाऱ्या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीगोंदा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील मोठ्या नेत्यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने श्रीगोंद्याच्या मातीत हजेरी लावली, यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी कारखानदार राहूलदादा जगताप यांचे भरभरून कौतुक केले.राज्यातील अनेक कारखानदार सत्तेच्या आमिषाला बळी पडले.परंतु राहूलदादा हे अपवाद आहेत. त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही आणि सत्तेपुढे मान झुकवली नाही, अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांची स्तुती केली.
      शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिवस्वराज्य यात्रा श्रीगोंद्यात गुरुवारी पोहोचली. नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या. या सभेला प्रमुख नेत्यांमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लेश लंके, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तसेच सभापती अतुल लोखंडे, जिजाबापू शिंदे, हरिदास शिर्के आणि केशवराव मगर उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार कोल्हे यांनी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. राज्यातील अनेक कारखान्यांना सरकारकडून थकहमी देण्यात आली, परंतु कुकडी आणि घोडगंगा सहकारी साखर कारखान्यांना नियमांमध्ये असतानाही ती नाकारण्यात आली. ज्यांनी फाईल अडवली, त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल. सरकारचा हेतू काय होता..? हे जनतेला माहीत आहे, अशा स्पष्ट शब्दांत कोल्हे यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे हित जोपासणारे सरकार सत्तेत आणणे हेच अंतिम ध्येय असल्याचे नमूद करत, खासदार कोल्हे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारे आणि तरुणांचे भले करणारे सरकार सत्तेत आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहा, असे भावनिक आवाहन त्यांनी उपस्थित जनतेला केले. खासदार कोल्हे यांनी राहूलदादा जगताप यांचे आवर्जून नाव घेत त्यांचे कौतुक करत, राहूलदादांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता शरद पवार यांची साथ सोडली नाही, हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे, असे सांगितले.

मतदारांच्या मनातीलच उमेदवार निवडला जातो ः जयंत पाटील – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी श्रीगोंद्याच्या सभेत मतदारांच्या मनातील उमेदवारच विजयी होतो, असे स्पष्ट केले. लोकसभेपूर्वी आम्हाला मोजत नव्हते, पण मतदारांनी आपले समर्थन दाखवून दिले. एकदा लाट आली की, पैशाला महत्व नसते. असे पाटील म्हणाले. त्यांनी पक्षातील समर्थक नेत्यांच्या कारखान्यांना कर्ज मिळण्यावर होणार्‍या अन्यायावरही भाष्य केले. शरद पवारांनी कुकडीचा प्रश्‍न आता सोडवला आहे.असेही त्यांनी सांगितले.

कुकडीचे थकीत 5 तारखेपूर्वी अदा करणारः राहुल जगताप – राहुल जगताप यांनी सांगितले की, कुकडी कारखान्याचे छउऊउ चे कर्ज मिळाले नसले तरी पवार साहेबांनी कुकडीच्या अडचणी सोडवल्या आहेत. त्यांनी आश्‍वासन दिले की, येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत सर्व थकीत देणी अदा करण्यात येतील.  विधानसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार 50,000 मतांनी विजय मिळवेल असा आत्मविश्‍वास आहे आणि नेत्यांना विनंती केली की, लोकसभेला जे सोबत राहिले त्यांचाच विधानसभेसाठी विचार करावा.

COMMENTS