Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधी लोकसभेत पुन्हा परतले

लोकसभा सचिवालयाकडून खासदारकी बहाल

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाने काँगे्रस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर सोमवारी लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी

राहुल गांधींची जीभ छाटू नका, तर तिला चटके द्या !
काँग्रेसच्या वतीने कल्याणमध्ये भाजपाच्या विरोधात बॅनरबाजी
ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स : राहुल गांधी यांचा सवाल

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाने काँगे्रस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर सोमवारी लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी करत, राहुल गांधींना लोकसभेचे सदस्यत्व पुन्हा बहाल केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सोमवारी राहुल गांधी लोकसभेत उपस्थित झाले होते.

सूरतमधील कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळे राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांची खासदारकी परत मिळाल्याने काँग्रेस पक्षाला मोठा बूस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे. मोदी आडनावरून केलेल्या टिप्पणीमुळे गुजरातच्या सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने तातडीने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. त्यानंतर गुजरात हायकोर्टानेही सूरत कोर्टाचा निकाल कायम ठेवत राहुल गांधींना धक्का दिला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देत राहुल गांधी यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर आता कोर्टाच्या निकालाचे सर्व कागदपत्रे काँग्रेस नेत्यांनी लोकसभा सचिवालयाला सुपूर्द केले. त्यानंतर राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी आता राहुल गांधी यांना संसदेच्या उर्वरीत अधिवेशनात सहभागी होता येणार आहे. राहुल गांधींना खासदारकी बहाल होणे हा काँग्रेससाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

विरोधक आज मांडणार अविश्‍वास प्रस्ताव – संसदेत विरोधी पक्षांकडून मोदी सरकारविरोधात आज मंगळवारी अविश्‍वास प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत अविश्‍वास प्रस्तावावर चर्चा करणार आहे. याचवेळी राहुल गांधी लोकसभेच्या कामकाजात सहभागी होणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करण्यात आल्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. खासदारकी रद्द आणि त्यानंतर बहाल करण्यात आल्याच्या निर्णयावरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

COMMENTS