Homeताज्या बातम्यादेश

खा. राहुल गांधींना सुलतानपूर कोर्टाचे समन्स

20 फेबु्रवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेशलखनऊ : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील खासदार-आमदार न्यायालयाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना के

राहुल गांधींची जीभ छाटू नका, तर तिला चटके द्या !
चीनच्या घुसखोरीवरून संसदेत गोंधळ
काँग्रेसचे ’हाथ से हाथ जोडो’ अभियान

20 फेबु्रवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
लखनऊ : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील खासदार-आमदार न्यायालयाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संबंधित मानहानीच्या प्रकरणात 20 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी ठरवलेल्या तारखेला राहुल गांधी गैरहजर राहिल्याने न्यायालयाने ही अंतिम संधी दिली असल्याचे सांगितले जाते.
राहुल गांधींचे वकील काशी शुक्ला यांनी न्यायालयात माहिती देताना सांगितले की, राहुल गांधी सध्या केरळमध्ये असून, त्यामुळे ते या सुनावणीस उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र न्यायालयाने या कारणाची नोंद घेत पुढील सुनावणीसाठी ठोस तारीख निश्‍चित केली आहे. हा खटला 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या एका विधानाशी संबंधित आहे. 8 मे 2018 रोजी बेंगळुरू येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सुलतानपूर येथील भाजप नेते आणि सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी मानहानीचा दावा दाखल केला होता. गेल्या पाच वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू असून, राहुल गांधी वारंवार गैरहजर राहिल्यामुळे डिसेंबर 2023 मध्ये तत्कालीन न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले होते. त्यानंतर 20 फेब्रुवारी 2024 रोजी राहुल गांधी न्यायालयात हजर राहिले होते. त्या वेळी विशेष दंडाधिकार्‍यांनी प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या दोन जामिनांवर त्यांना जामीन मंजूर केला होता.

COMMENTS