Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेळेवर न पोहोचल्याने राहुल गांधींना शिक्षा! काँग्रेस शिबिरात आनंदाने मारले 10 पुश-अप्स..

https://www.youtube.com/watch?v=oMrJPwAAdo0 मध्य प्रदेशातील पंचमढी येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी 2 मिनिटं उशिरा

सिंगापूरहून पुणे विमानतळावर उतरलेला प्रवासी करोना बाधित
मोदी सरकारची प्रधानमंत्री जन धन लूट योजना
१० वी १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक | DAINIK LOKMNTHAN

मध्य प्रदेशातील पंचमढी येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी 2 मिनिटं उशिरा पोहोचले. शिबिरातील नियमांनुसार त्यांनी आनंदाने शिक्षा म्हणून 10 पुश-अप्स मारले. काँग्रेसच्या या प्रशिक्षण शिबिरात संघटन सृजन अभियान अंतर्गत सर्व सहभागींसाठी एक नियम ठरवण्यात आला होता. जो वेळेत येणार नाही, त्याला शिक्षा म्हणून 10 पुश-अप्स मारावे लागतील. राहुल गांधी उशिरा आल्यावर त्यांनी स्वतः पुढाकार घेत हा नियम पाळला आणि 10 पुश-अप्स पूर्ण केले. या प्रसंगाची माहिती काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने दिली असून, पक्षातील अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या या वागण्याचं कौतुक केलं आहे.

COMMENTS