Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते

20 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत प्रथमच भूषवणार घटनात्मक पद

नवी दिल्ली ः 18 व्या लोकसभेत काँगे्रसने 99 जागा मिळवल्यामुळे काँगे्रसला लोकसभेतील विरोधीपक्षनेते पद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. कारण 2014 आण

राहुल गांधींना सूरत कोर्टाने दिलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
मणिपुरमध्ये राहुल गांधींनी घेतली पीडितांची भेट
राहुल गांधी लोकसभेत पुन्हा परतले

नवी दिल्ली ः 18 व्या लोकसभेत काँगे्रसने 99 जागा मिळवल्यामुळे काँगे्रसला लोकसभेतील विरोधीपक्षनेते पद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. कारण 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँगे्रस अर्धशतकी खासदार निवडून आणू शकली नव्हती, त्यामुळे काँगे्रसला विरोधी पक्षनेते पद मिळाले नव्हते. मात्र काँगे्रसने 99 खासदार निवडून आणल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा झाला होता, त्यानंतर बुधवारी राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाने ही घोषणा केली. यानंतर काँग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. 20 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत राहुल पहिल्यांदाच घटनात्मक पद भूषवणार आहेत. हे पद भूषवणारे ते गांधी कुटुंबातील तिसरे सदस्य असतील. याआधी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1989-90 आणि आई सोनिया यांनी 1999 ते 2004 पर्यंत हे पद भूषवले होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद 10 वर्षांपासून रिक्त होते. 2014 आणि 2019 मध्ये कोणत्याही विरोधी पक्षाकडे यासाठी आवश्यक असलेले किमान 10% सदस्य नव्हते. विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्यासाठी कोणत्याही पक्षाला एकूण 543 पैकी 55 सदस्यांचा आकडा पार करावा लागतो. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस 99 जागांसह सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. भाजपच्या 240 आणि एनडीएच्या 293 जागांच्या तुलनेत इंडिया अलायन्सने 232 जागा जिंकल्या. यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 52 जागा मिळाल्या होत्या. 2014च्या निवडणुकीत पक्षाला केवळ 44 जागा जिंकता आल्या होत्या.

COMMENTS