Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता तालुका बालविवाहमुक्त करणार; अंगणवाडी सेविकांचा निर्धार ; ‘माझे गाव बालविवाह मुक्त’ कार्यशाळा उत्साहात

 राहाता : “यापुढे राहाता तालुक्यात एकही बालविवाह होऊ देणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त करत ३१८ अंगणवाडी सेविकांनी “माझे गाव बालविवाह मुक्त गाव” या कार्यशाळेतून समाजपरिवर्तनाची नवी दिशा स्वीकारली. बालविवाह किती घातक आहे, याची जाणीव या कार्यशाळेमुळे अधिक ठळकपणे झाली असून, गावपातळीवर तात्काळ कृती करण्याचा संकल्प सर्वांनी केला.   जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, उडान प्रकल्पाच्या मानद संचालिका ऍड. बागेश्री जरंडीकर आणि स्नेहालय संस्थेचे संचालक हनिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात बालविवाहमुक्त गाव निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प विभाग, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.  कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्नेहालय उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी सखोल मार्गदर्शन केले.  प्रविण कदम यांनी स्पष्ट केले की, “बालविवाह हा मुलींच्या आयुष्याला जिवंत नरक बनवणारा प्रकार आहे. लहान वयात लावलेली लग्ने अनेकदा टिकत नाहीत आणि त्यातून मुलींचे शिक्षण, आरोग्य व भविष्य धोक्यात येते.” त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने या प्रथेविरुद्ध ठामपणे उभे राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.  बाल संरक्षण अधिकारी विकास बागुल यांनी कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच महिला व बालकांसाठी उपलब्ध शासकीय योजनांची माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाईनचे राहुल वैराळ यांनी १०९८ या हेल्पलाईन क्रमांकाची माहिती देत बालकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध सेवांविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी महिला सक्षमीकरण केंद्राच्या साक्षी मानकर यांनी सर्व उपस्थितांना बालविवाह विरोधी प्रतिज्ञा दिली.  या कार्यक्रमासाठी आर. एल. गंभीरे (सीपीडीओ तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी), विकास बागुल (बाल संरक्षण अधिकारी) बेटी बचाव बेटी पढाव यांच्या तालुका सदस्य आणि उडान चे तालुका प्रतिनिधी संदीप गाडेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच पर्यवेक्षिका डी. एस. गडगे, के. आर. अंधुरे,  एस. एस. पोटघन, आर. डी. गोडे,  एस. सी. विभुते, स्नेहल जगदाळे, सोनाली कुंजी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यशाळेदरम्यान अंगणवाडी सेविका अर्चना अशोक विखे (लोणी बुद्रुक) व मंगल करपे (डोऱ्हाळे) यांनी आपले अनुभव व अभिप्राय मांडत, गावपातळीवर प्रभावी काम करण्याची तयारी दर्शवली. आभार  पर्यवेक्षिका दीपाली गडगे यांनी मानले.

आ. काळेंकडून अवैध वाळू उपशाचा प्रश्न विधिमंडळात
संजीवनी फार्मसीच्या १२ विद्यार्थ्यांना नोकरी 
शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 राहाता : “यापुढे राहाता तालुक्यात एकही बालविवाह होऊ देणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त करत ३१८ अंगणवाडी सेविकांनी “माझे गाव बालविवाह मुक्त गाव” या कार्यशाळेतून समाजपरिवर्तनाची नवी दिशा स्वीकारली. बालविवाह किती घातक आहे, याची जाणीव या कार्यशाळेमुळे अधिक ठळकपणे झाली असून, गावपातळीवर तात्काळ कृती करण्याचा संकल्प सर्वांनी केला.

  जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, उडान प्रकल्पाच्या मानद संचालिका ऍड. बागेश्री जरंडीकर आणि स्नेहालय संस्थेचे संचालक हनिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात बालविवाहमुक्त गाव निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प विभाग, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

 कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्नेहालय उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी सखोल मार्गदर्शन केले.  प्रविण कदम यांनी स्पष्ट केले की, “बालविवाह हा मुलींच्या आयुष्याला जिवंत नरक बनवणारा प्रकार आहे. लहान वयात लावलेली लग्ने अनेकदा टिकत नाहीत आणि त्यातून मुलींचे शिक्षण, आरोग्य व भविष्य धोक्यात येते.” त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने या प्रथेविरुद्ध ठामपणे उभे राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 बाल संरक्षण अधिकारी विकास बागुल यांनी कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच महिला व बालकांसाठी उपलब्ध शासकीय योजनांची माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाईनचे राहुल वैराळ यांनी १०९८ या हेल्पलाईन क्रमांकाची माहिती देत बालकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध सेवांविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी महिला सक्षमीकरण केंद्राच्या साक्षी मानकर यांनी सर्व उपस्थितांना बालविवाह विरोधी प्रतिज्ञा दिली.

 या कार्यक्रमासाठी आर. एल. गंभीरे (सीपीडीओ तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी), विकास बागुल (बाल संरक्षण अधिकारी) बेटी बचाव बेटी पढाव यांच्या तालुका सदस्य आणि उडान चे तालुका प्रतिनिधी संदीप गाडेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच पर्यवेक्षिका डी. एस. गडगे, के. आर. अंधुरे,  एस. एस. पोटघन, आर. डी. गोडे,  एस. सी. विभुते, स्नेहल जगदाळे, सोनाली कुंजी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

कार्यशाळेदरम्यान अंगणवाडी सेविका अर्चना अशोक विखे (लोणी बुद्रुक) व मंगल करपे (डोऱ्हाळे) यांनी आपले अनुभव व अभिप्राय मांडत, गावपातळीवर प्रभावी काम करण्याची तयारी दर्शवली. आभार  पर्यवेक्षिका दीपाली गडगे यांनी मानले.

COMMENTS