पुणे ः मराठा समाजाच्या मनात सत्ताधार्यांविरोधात खदखद असून, आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब उमटेल असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरका

पुणे ः मराठा समाजाच्या मनात सत्ताधार्यांविरोधात खदखद असून, आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब उमटेल असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मनोज जरांगे हे रविवारी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर दौर्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाच्या मनात खदखद आहे. मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी धोका दिला. याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाज आपला रोष व्यक्त करेल, असे जरांगे म्हणाले. दरम्यान, या दौर्या दरम्यान मनोज जरांगे मराठा समाजाच्या वेगवेगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी भेट घेतली. पुढे मनोज जरांगे मराठा आंदोलकांना उद्देशून म्हणाले, माझा काही राजकीय मार्ग नसल्याने मी त्यापासून अलिप्त आहे. तसेच मी कोणताही उमेदवार दिला नाही आणि कुणाला पाठिंबाही दिलेला नाही. मात्र समाजाने ही निवडणूक हातात घेतली आहे. समाजाला ज्याला पाडायचा आहे त्याला पाडेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्याचा आहे. आमचा प्रश्न दिल्लीतील नाही, असे जरांगे म्हणाले. यावेळी जरांगे म्हणाले, सरकारने सगेसोयर्याची अधिसूचना काढली मात्र त्याची अंबलबजावणी केली नाही. मराठा समाज हुशार आहे. मात्र माझा नाईलाज आहे. निवडणुकीसारखी कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करायला हवी. सात महिन्यात मी गृहमंत्री आणि सरकारचा एकही डाव यशस्वी होऊ दिला नाही. त्यांचा डाव यशस्वी झाला असता तर मी समाज एकत्र केला आणि मीच समाजाला मातीत घातले असे झाले असते असे जरांगे म्हणाले.
COMMENTS