Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये भाजपाच्या चिंतन बैठकीत राडा

नांदेड : नांदेडमध्ये भाजपची चिंतन बैठक सुरू होण्यापूर्वीच पदाधिकार्‍यांमध्ये चांगलाच राडा झाला. काही पदाधिकारी एकमेकांना मारण्यासाठी अंगावर धावून

ऑनलाईन बैठक अचानक झाली ऑफलाईन; अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार
अरणगाव ग्रामपंचायतीला सदस्य ठोकणार टाळे
परशुराम जयंती निमित्ताने मोटार सायकल रॅली

नांदेड : नांदेडमध्ये भाजपची चिंतन बैठक सुरू होण्यापूर्वीच पदाधिकार्‍यांमध्ये चांगलाच राडा झाला. काही पदाधिकारी एकमेकांना मारण्यासाठी अंगावर धावून गेले. नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी मोठ्या मताधिक्यांनी त्यांचा पराभव केला. सलग 10 वर्ष ताब्यात असलेला मतदारसंघ अचानक हातातून गेल्यामुळे नांदेडमध्ये भाजपकडून चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण पाटील उपस्थित होते. मात्र, चिंतन बैठक सुरू होण्यापूर्वीच भाजपाच्या पदाधिकार्‍यांमध्ये चांगलाच राडा झाला.

COMMENTS