Homeताज्या बातम्यामनोरंजन

भोजपुरी स्टार पवन सिंहच्या कार्यक्रमात राडा

उत्तर प्रदेशातील बलिया येथे एका कार्यक्रमादरम्यान भोजपुरी स्टार पवन सिंगवर दगडफेक करण्यात आली. सोमवारी रात्री हा हल्ला झाला. आधी विशिष्ट जातीवर ग

सगळ्या निवडणूक प्रक्रियेची थट्टा करून टाकली आहे… राज ठाकरेंचा घणाघात
सोशल मीडियाद्वारे जातीय तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई व्हावी
कराडला रिक्षा व्यावसायिकांचे आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन

उत्तर प्रदेशातील बलिया येथे एका कार्यक्रमादरम्यान भोजपुरी स्टार पवन सिंगवर दगडफेक करण्यात आली. सोमवारी रात्री हा हल्ला झाला. आधी विशिष्ट जातीवर गाण्याच्या मागणीवरून गदारोळ झाला. पवनने ते गाणे गाण्यास नकार दिल्यावर कोणीतरी त्याच्यावर दगडफेक केली. हिंसक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. लोकांनी मंचावर दगडफेक केली. पवन सिंग आणि गायिका शिल्पी राज एका खाजगी कार्यक्रमात परफॉर्म करत होते, त्यासाठी परवानगी घेण्यात आली होती. पवन आणि शिल्पीला ऐकण्यासाठी मोठा जमाव जमला होता आणि कार्यक्रमस्थळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही हा हल्ला झाला.

COMMENTS