Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड लोकसभेसाठी रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नांदेडमधील पोटनिवडणुकांची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. राज्याती

मेरठमधून आयएसआय एजंटला अटक
Indapur : बावडा शहाजीबाग येथे भीषण अपघात (Video)
बॉम्बची खोटी माहिती दिल्यास 1 कोटीपर्यंतचा दंड :केंद्र सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नांदेडमधील पोटनिवडणुकांची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. राज्यातील विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी देखील 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने अधिकृतपणे परिपत्रक जारी करत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. रविंद्र चव्हाण हे नांदडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वसंत चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे येथील जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.

COMMENTS