राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेसह पुत्राची ‘ईडी’कडून चौकशी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेसह पुत्राची ‘ईडी’कडून चौकशी

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्या असून, या कारवाया राष्ट्रवादी काँगे्रस आणि शिवसेना नेत्यांवर होतांना दिसून येत आहे. राष्ट्

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 
छत्रपती संभाजी महाराज याच्या जयंती निमित्त अनाम प्रेम संस्थेस छावा संघटनेच्या वतीने सामाजिक उपक्रम
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा सीझन लवकरच येणार ?

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्या असून, या कारवाया राष्ट्रवादी काँगे्रस आणि शिवसेना नेत्यांवर होतांना दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँगे्रसमधील आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांच्यामागे ईडीचा ससेमिरा मागे लागला असून, काल त्यांची चौकशी करण्यात आली.
साखर कारखान्यातील शेतकर्‍यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्यासोबतच अन्य प्रकरणांमध्ये ईडीकडून ही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एवढच नाही तर साखर कारखान्याचे हे संपूर्ण प्रकरण 500 कोटींच्या घरात जात असल्याची माहिती आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. आता पर्यंत या पिता-पुत्राची तीनवेळा चौकशी झाली असल्याचे देखील समोर येत आहे. या पूर्वी देखील राष्ट्रवादी काँगे्रसच्या अनेक नेत्यांवर ईडी आणि प्राप्तिकर विभागाचे छापे पडले असून, राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या अटकेत असून, अनेक नेत्यांवर अजूनही अटकेची टांगती तलवार कायम आहे.

पास यंत्रणांच्या विरोधात जनतेत संताप : शरद पवार
देशात अलीकडच्या काही महिन्यात याला अटक कर, याला आत टाक, धमक्या दे असे सुरू आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप 100 कोटी गोळा करा असे सांगितले. पहिली चार्जशीट 100 कोटी गोळा केला आरोप नंतर दुरुस्त केली, 4 कोटी 70 लाख. नंतर पुन्हा दुरुस्त 1 कोटी 7 लाख झाला. म्हणजे हे 100 % टक्के खोटे आहे. केंद्रीय तपास यंत्रणा कुणाच्या तरी सांगण्यावरून काम करत आहेत हे लोकांना समजते. लोकांमध्ये संताप आणि नाराजी आहे. ती योग्य वेळी दिसेल, असा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत दिला.

COMMENTS