ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाने जगातील दुसऱ्या क्रमांकाची राजेशाही सत्तेवर असण्याचा विक्रम केला. सलग सत्तर वर्षे राजा किंवा महाराणी म्ह
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाने जगातील दुसऱ्या क्रमांकाची राजेशाही सत्तेवर असण्याचा विक्रम केला. सलग सत्तर वर्षे राजा किंवा महाराणी म्हणून एखाद्या देशाचे प्रमुख असणे दुसऱ्या महायुध्दानंतरच्या काळात पाहिल्यास हा एक अनोखा विक्रम आहे. जाॅर्ज-६ यांच्या कन्या असणाऱ्या एलिझाबेथ यांचे पूर्ण नाव एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी. दुसरे महायुद्ध सुरू असताना सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंडच्या राजपरिवाराती सदस्यांना कॅनडात स्थलांतरित करण्याची योजना तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी आखली होती. त्यावेळी, जाॅर्ज-६ हे राजे होते. एलिझाबेथ या अवघ्या १३ वर्षाच्या होत्या. त्यावेळी त्यांच्या एका लहान भावासह त्यांना कॅनडात सुरक्षित स्थळी हलविण्याचा तत्कालीन सरकारने ठरवले. पण, यास एलिझाबेथ यांच्या आई एलिझाबेथ बाऊझ-लेयान यांनी स्पष्ट नकार दिला. नकार देताना त्या म्हणाल्या की, ” माझ्याशिवाय माझ्या मुली जाणार नाहीत, मी राजाशिवाय जाणार नाही आणि राजा इंग्लंड सोडून जाणार नाहीत”, अशा शब्दांत त्यांनी नकार दिला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोणत्याही ठिकाणी हल्ले होण्याची भीती असताना केवळ जीव वाचवण्यासाठी आपल्या देशाच्या नागरिकांना सोडून जाण्यास या कुटूंबाने ज्या बाणेदार पध्दतीने नाकारले तो बाणेदारपणा ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या व्यक्तिमत्त्वात कायम दिसला. त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षीच ग्रीसच्या राजकुमार बरोबर आपले प्रेम असल्याचे सांगून टाकले होते. परंतु, त्यांचा प्रत्यक्ष विवाह हा एकविसाव्या वर्षी म्हणजे १९४७ साली ग्रीस-डेन्मार्क चे राजकुमार फिलिप ड्यूक यांच्याशी झाला. अर्थात, तत्कालीन ब्रिटिश कायद्यानुसार फिलिप ड्यूक यांना इंग्लंडमध्ये कोणतेही घर नव्हते. त्यामुळे, राजकुमारी एलिझाबेथ यांना लग्नासाठी संघर्ष करावा लागला. १९४७ साली त्यांचा विवाह झाला होता; त्यांचे हे वैवाहिक जीवन फिलिप ड्यूक यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत कायम होते. जवळपास ७४ वर्षाचे वैवाहिक जीवन आणि ७० वर्षाचे महाराणीपद म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहीले. तसा ब्रिटिश माणूस हा आपल्या परंपरा आणि संस्कृतीवर प्रेम करणारा. त्यामुळे, ब्रिटनच्या राजसत्तेला एक दीर्घकाळाची परंपरा असल्याने ब्रिटिश नागरिकांनी ती केवळ स्विकारलीच नाही; तर त्या परंपरेचा एक सन्मानही राखला. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आली. अर्थात, ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य यानंतर जगभरातून माघारी फिरला होता. अशा काळात राष्ट्रकुल असणाऱ्या देशांचे प्रमुख पदही महाराणी एलिझाबेथ यांच्याकडे राहीले. अर्थात, आता त्या ब्रिटनच्या नामधारी प्रमुख राहिल्या होत्या. नामधारी प्रमुख म्हणून त्यांच्याकडे तेच अधिकार होते जे भारताच्या राष्ट्रपतींना असतात. जसे की, निवडणूक निकाल लागल्यानंतर बहुमताच्या पक्षाला सत्तास्थापनेचे निमंत्रण देणे, तेथील संसंदेने मंजूर केलेल्या कायद्यांवर स्वाक्षरी करणे, याबरोबरच ब्रिटिश पंतप्रधान दर आठवड्याला राजा किंवा महाराणी यांना भेटून आपल्या कामकाजाची माहिती देतात. शिवाय, मंत्रालयातून त्यांच्याकडे दररोज काही दस्तऐवज पाठवून त्या – त्या दिवसाच्या कामकाजाला परवानगी देण्याची औपचारिकता केली जाते. अशा समृद्ध लोकशाही परंपरेत महाराणी एलिझाबेथ यांनी स्वतः ला त्या भूमिकेत न्याय्य पद्धतीने बसवले. अर्थात, ब्रिटिश नागरिकांनी या परंपरांचा सन्मान केला असला तरी, त्या नागरिकांनी राजघराण्याविषयी बंडही पुकारले. विशेष करून राणी एलिझाबेथ यांच्या सून असणाऱ्या डायना यांच्या वरून नंतर अनेक कारणास्तव राजघराण्याविरोधात जनतेने आवाज उठवला. राणी कर भरत नाही, यावरही जनतेने आक्षेप घेऊन त्यांना टॅक्स भरण्यास भाग पाडले. खासकरून नव्वदीच्या दशकात हा संघर्षाला राजघराण्याला सामोरे जावे लागले. दीर्घकाळ राजेशाही अनुभवूनही जनतेच्या प्रति संवेदनशील राहणे, ही बाब त्यांनी त्यांच्या जीवनात पाळली. दीर्घायुष्य, दीर्घ वैवाहिक आयुष्य आणि दीर्घकाळ सत्तापद हे तीन त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्ये ठरले.
COMMENTS