अवैदिक हिंदूंच्या लूटीसाठी पुरोहितांच्या मारामाऱ्या !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

अवैदिक हिंदूंच्या लूटीसाठी पुरोहितांच्या मारामाऱ्या !

मंदिरात देव नाही तर पुजाऱ्याचे पोट राहते अशा प्रकारचा प्रबोधनाचा अजेंडा संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्र मध्ये राबवला होता. परंतु आता मंदिरात देव नाही

नर्मदा परिक्रमेमुळे आत्मिक समाधान मिळते – डॉ. राजेंद्र पिपाडा
सर्वसामान्यांचे प्रेम हेच खरे समाधान ः प्राचार्य शिवाजीराव भोर
घराणेशाहीमुळे काँग्रेसचे दुकान बंद होण्याची वेळ

मंदिरात देव नाही तर पुजाऱ्याचे पोट राहते अशा प्रकारचा प्रबोधनाचा अजेंडा संत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्र मध्ये राबवला होता. परंतु आता मंदिरात देव नाही तर पुजाऱ्यांची भौतिक स्वप्न वास्तवात साकारण्याची मनस्थिती कार्यरत असते. याचा अर्थ पुजाऱ्याचे पोट नाही तर केवळ आर्थिक संपत्ती लाटण्याची ही केंद्र झाली आहेत. मंदिरांमध्ये पौरोहित्य करण्याचा अधिकार धर्मशास्त्राने एकाच जातीला देऊन ठेवला आहे. त्यामुळे एकाच धर्माचे असणारे हिंदू धर्म बांधव जे पुरोहित किंवा पोर आहेत जागी यांचा जन्म झाला नाही अशा हिंदू बांधवांना केवळ मंदिरात जाऊन पुजाऱ्यांच्या जोड्या फक्त दक्षिणेने भराव्या लगत आहेत. धर्माच्या विरोधात असणारा मार्च हा नेहमी म्हणत असेल ही जगामध्ये दोन व्यक्तींमध्ये दो प्रांतांमध्ये दोन देशांमध्ये जेव्हा-केव्हा युद्ध होतात त्या युद्धाचे कारण हे अर्थशास्त्र किंवा आर्थिक कारणांमध्ये असते. या देशातील महान विद्वान आणि महात्मा ठरलेले तात्यासाहेब ज्योतिबा फुले यांनी देखील या संदर्भात म्हटले आहे की धर्मशास्त्राच्या ढुंग्या देशातील बहुजन समाजातील शोषण केले जाते शोषण ही संकल्पना अर्थशास्त्रीय आहे त्यामुळे जात आणि समाज संघाची जेव्हा शोषण होते तेव्हा ते आर्थिक असते आणि आर्थिक शोषणाचा मुख्य केंद्रबिंदू ही मंदिरे आणि त्यातली पौरोहित्य करणारी व्यवस्था आहे असे, आतापर्यंत अनेक महामानवांनी स्पष्ट केले आहे. तेव्हा नाव महाराष्ट्रात वैदिक हिंदू पंथ म्हणून असणारा संत चळवळीचा गाभा जरी आपण पाहिला तरी त्यांनी मंदिरातील पौरोहित्यास कायम विरोध केला आहे. आज हा सगळा विषय सांगण्याचे कारण असे की महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नाशिक येथील त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात नागबली पूजेवरून  पुरोहितांमध्ये झालेली मारामारी ही याची साक्ष देते. पुरोहितांच्या या आर्थिक हितसंबंधांचे आजपर्यंत तरी अवैदिक हिंदू बांधवांनी कधीही लक्ष दिले नाही; त्यामुळे त्यांनी आपले हात पुरोहितांना दान दक्षिणेसाठी नेहमी मोकळे ठेवले आणि त्यामुळे या अवैदिक हिंदू बांधवांची आर्थिक लूट होत गेली आणि पुरोहित जातींच्या घरात साठत गेली. भारतातील अनेक मंदिरे अब्जावधींचा संपत्तीसाठी आहे ही संपत्ती जनतेसाठी खुली करावी किंवा सरकारने ती ताब्यात घ्यावी अशा मागण्याही वेळोवेळी जोर पकडत परंतु पुरोहित जातींचे मंदिरांवर असलेल्या वर्चस्वामुळे आजपर्यंत यावर अंमलबजावणी कधीही शक्य झाली नाही. शिवाय वैदिक हिंदू बांधव आतील कोणालाही पुरोहित याचा अधिकार दिला जात नाही त्यामुळे पुरोहितशाही आजही समाजव्यवस्थेमध्ये वरचढ आहे आणि आता तर त्यांच्या मंदिरातील ही सेवा टनांवरून उघडपणे मारामाऱ्या होऊ लागले आहेत. ही बाब अवैदिक हिंदू बांधवांनी गांभीर्याने लक्षात घेण्याची गरज आहे. देशातील कोणत्याही मंदिरात पुरोहित जातींसाठी पुजाऱ्यांची जागा आहे या अप्रत्यक्षपणे राखीव असतात. मात्र, या बाबीला आता सर्वात प्रथम तमिळनाडू सरकार जाहीरपणे आव्हान दिले असून तमिळनाडूतील मंदिरांमध्ये पुरोहितांच्या जागा आता बहुजन समाजातून भरल्या जाणार आहेत. यासाठी तमिळनाडू सरकारने काही परीक्षांचा अवलंब केला आहे. बकरी या अनुषंगाने एक बाब सांगणे अतिशय महत्त्वाचे आहे ती सर्वसामान्य माणूस हा अनेक समस्यांनी ग्रस्त असतो अशावेळी त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी त्याचे मन काहीवेळा ज्या बाबींकडे वरती त्यातली धर्म आणि त्या धर्माची देवळे ही एक बाब प्रकर्षाने समोर येते. मात्र कोणतीही धर्म व्यवस्था ही कर्मकांड आतून सिद्ध होत नाही तर ती त्या धर्माने दिलेल्या अध्यात्माच्या मार्गावर त्या समाज समुहाला नेण्यात असते. परंतु पुरोहितशाहीची संपूर्ण व्यवस्थाच कर्मकांडावर अवलंबून असल्याने व्यक्तीला मनःशांती देणारी अध्यात्मिक व्यवस्था ती शिकवत नाही; तर, वेगवेगळी कर्मकांडे सांगून त्याच्यातून आर्थिक लूट करण्याचे षड्यंत्र हे आजपर्यंत अवलंबले जाते आहे. त्यामुळे धर्माच्या मंदिरांमध्ये व्यक्तीला अध्यात्मिक शांती मिळत नसून उलट त्याची आर्थिक लूट होऊन तो अधिक समस्याग्रस्त होतो आहे, असे वास्तव समोर येते. संत कबीर,  पासून संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत गोरोबा, संत सावतामाळी, संत नरहरी, संत चोखोबा, संत बहिणाबाई या सगळ्या संत सर्व येणे अवैदिक हिंदू धर्म व्यवस्थेची मांडणी केली असून त्यात आत्मिक अध्यात्माला त्यांनी महत्व दिले आहे. संत चळवळीने कोणत्याही कर्मकांडाला जन्म दिला नाही की, कधीही त्याचे समर्थन केले नाही. त्याचा व्यवहार जपला नाही. मात्र, कर्मकांडाचा व्यवहार निर्माण करून या देशातील पुरोहितशाही ने या देशातील अवैदिक हिंदू असणाऱ्या बहुजन समाजाची आर्थिक लूट करण्यामध्ये आपली षड्यंत्र मजबूत केली आहेत. त्याचे दृश्य निदर्शन नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे नागबली पूजेवरून झालेल्या आर्थिक हिस्से वाटणीच्या वादातून पुरोहितांच्या मारामाऱ्यांतून आपल्याला दिसते. आता, बहुजन समाज हा अवैदिक हिंदू समाज आहे, त्यांनी आपली देवस्थाने निर्माण करून पौरोहित्य आपल्या ताब्यात घेणे हा यावर एक पर्याय होऊ शकतो.

COMMENTS