Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील वाहतूक कोंडीवर दोन नव्या उड्डाण पुलाचा उतारा

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहरातील वाहतूक कोंडी नित्याचीच. मेट्रो येवून देखील ही वाहतूक कोंडी कमी झालेली नाही. परिणामी ही वाहतूक कोेंंडी सोडवण्यासाठी

लग्नात नवरदेवाने मोटारसायकलची मागणी केल्यावर सासऱ्याने चप्पलेने मारहाण केली
माझ्या मतदार संघातील जनता सुखी राहू दे
आमदाराच्या गाडीने सात पोलिसांसह २२ जणांना चिरडले | LOKNews24

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहरातील वाहतूक कोंडी नित्याचीच. मेट्रो येवून देखील ही वाहतूक कोंडी कमी झालेली नाही. परिणामी ही वाहतूक कोेंंडी सोडवण्यासाठी दोन उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. पुण्यातील चांदणी चौकातील पुल उभारल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आता पुण्यात आणखी दोन नव्या उड्डाण पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. यातील एका उड्डाण पुलाची उभारणी सनसिटी आणि कर्वेनगर दरम्यान होणार आहे. तर 49 वर्षे जुना साधु वासवानी ब्रिज पाडून नव्याने त्या जागी नवा उड्डाण पुलाची बांधण्यात करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलाची उभारणी करणार आहे.
पुण्यातील सिंहगड रोड आणि कर्वेनगर आणि कोथरुड परीसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सनसिटी आणि कर्वेनगर दरम्यानच्या उड्डाण पुलाला मंजूरी देण्यात आली होती. परंतू कंत्राटदार बँककरप्ट झाल्याने काम रखडले होते. आता नवीन या पुलाचे काम 12 टक्के कमी बोलीवर नव्या कंत्राटदाराला दिले आहे. पुणे महानगर पालिकेच्या स्टँडींग कमिटीने या पुलाच्या कामाला मंजूरी दिली असून 37 कोटी 4 लाखात आता या पुलाचे काम होणार आहे. 49 वर्षे जुन्या साधू वासवानी पुलाला पाडून त्या जागी नवा पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. कॅम्प आणि कोरेगाव पार्क विभागाला जोडणार्‍या या पुलाच्या बांधकामासाठी पुणे महानगर पालिकेने नेमलेल्या सल्लागाराने नवा ब्रिज बांधण्याचा सल्ला दिला आहे. एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यासाठी सर्वात कमी बोली लावल्याने 58 लाख 11 हजार 336 रुपयांचे टेंडर मंजूर झाले आहे. या पुलाचे काम सुरु झाले की येथील वाहतूक पुणे स्टेशन एरीयातून वळविण्यात येणार आहे. या पुलाचे उभारणी करण्यासाठी मान्सून काळ वगळून 24 महिने लागणार आहेत. पर्यायी मार्गावरुन वाहतूक वळविण्यात येणार आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन मुळा नदीवर बोपोडी आणि औंध दरम्यान नवा पुल उभारणार असून त्याने पुण्याला पिंपरी-चिंचवड शहराशी जोडता येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी 36.25 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पुणे महानगर पालिका या पुलाची अर्ध्या रक्कमेचा भार (18.13 कोटी ) उचलणार आहे.

COMMENTS