पुणे प्रतिनिधी- पुणे शहरातील सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पुणेकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच पुण्यातील चांदणी
पुणे प्रतिनिधी– पुणे शहरातील सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पुणेकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच पुण्यातील चांदणी चौकात तासन् तास वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. चांदणी चौकातील या वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावा, असे साकडे पुणेकरांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांना घातले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रोडमार्गे साताऱ्याला जात असताना खुद्द मुख्यमंत्र्यांचा ताफा चांदणी चौकाच्या वाहतूक कोंडीत अडकला. त्यावेळी स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन देखील दिले. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीवर काहीतरी मार्ग काढा, अशी विनंती स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

COMMENTS