Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे प्रादेशिक सा.बां. विभागात भ्रष्टाचाराचा हैदोस

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची बदनामी करण्याचे षडयंत्र

मंगेश पंचपोर यांजकडूनपुणे ः पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील निविदा घोटाळ्यांची पोलखोल केल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहे. या संपूर्ण

खा. लोखंडेंनी मानहानीचा दावा करून आपली स्वच्छ प्रतिमा का सिद्ध केली नाही ?
श्रीमती जयश्री सोनकवडे यांना ‘त्या’ व्हिडिओप्रकरणी कायदेशीर नोटीस
सचिव भांगेंना बाईंनी दिली ‘छोबीपछाड’

मंगेश पंचपोर यांजकडून
पुणे ः पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील निविदा घोटाळ्यांची पोलखोल केल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहे. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली असून, यावर लवकरच कारवाई होण्याचे प्रस्तावित आहे. यासंदर्भातील चौकशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडून या 1 हजार 33 कोटींच्या निविदा घोटाळयाची चौकशी करण्याचे प्रस्तावित असल्यामुळे पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येणार यात शंका नाही.

मुख्य अभियंता यांनी आपल्या मर्जीतील विशेष कंत्राटदारांना जवळ केले असून, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मर्जीतील असल्यामुळे आपले कुणी काही वाकडे करू शकत नाही, असा तोरा मुख्यअभियंता यांचा दिसून येत आहे. मात्र देशात कायद्याचे राज्य असून, पुण्यातील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणामध्ये एकाच कुटुंबांतील तीन पिढ्या तुरुंगात आहेत. त्यामुळे आपले कुणीच काही वाकडे करू शकणार नाही, असा समज कायद्याच्या राज्यात मोडून निघतो, त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी झाल्यानंतर शासनाचे हजारो कोटी रूपये कुणाच्या घशात गेले, किती खर्च झाले, याचा हिशोब जनतेला द्यावा लागणार आहे. जनतेच्या पैशांचा अपव्यय करून, शासनाची कोट्यावधींची फसवणूक यानिमित्ताने समोर येणार आहे. पुणे प्रादेशिक विभागाअंतर्गत आजपर्यंत रस्त्यांसंदर्भातील जी निविदांची कामे करण्यात आली, ती प्रत्यक्षात आली का ? हा देखील गहन प्रश्‍न आहे. काही दिवसांपूर्वीच या कामांच्या देखभालीसाठी कोट्यावधीं रूपये खर्च करण्यात आल्यानंतर लगेचच नव्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील कामे आणि काढण्यात आलेल्या निविदा आम्ही त्यांच्या क्रमाकांसह दैनिक लोकमंथनमध्ये छापल्या आहेत. त्यामुळे अनेकांना पळाताभुई थोडी होतांना दिसून येत आहे.

जोपर्यंत झाकून आहे तोपर्यंतच साथ – पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागात जो निविदा घोटाळा सुरू आहे. त्यामागे अनेकांचा हात आहे. त्यामुळे मुख्य अभियंता जरा निवांत आहेत. मात्र भ्रष्टाचाराचा बुरखा फाटल्यानंतर कुणीही साथ देत नाही, याचा साक्षात्कार लवकरच मुख्य अभियंता यांना घडेल, यात शंकाच नाही. जोपर्यंत झाकून होते, तोपर्यंतच अनेकांनी साथ दिली, मात्र आता या निविदा घोटाळ्यांचा सगळा कच्चा चिठ्ठा आम्ही जनतेसमोर मांडत असून, जनतेच्या तब्बल 1 हजार कोटी रूपयांचा चुराडा करत तो आपल्याच घशात घालण्याचा अघोरीपणा या विभागात सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे.

उद्याच्या अंकात वाचा.. – उद्याच्या अंकात पुन्हा एकदा पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागात जो निविदांचा धुडगूस घातला आहे, त्यातील निविदा क्रमांकांसह, अंदाजित रक्कम आणि अर्नेस्ट बियाणांच्या तपशीलासह पर्दाफाश करणार आहोत.

नांदेड सार्व. बांधकाम विभागातही निविदा घोटाळाचा पॅटर्न सारखाच – नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागात देखील मुख्य अभियंता पांढरे यांनी असाच पुणे प्रादेशिक विभागासारखा निविदा घोटाळा घातला आहे. नांदेड विभागा अंतर्गत काढण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये हजारो कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. तसेच या रस्त्यांच्या कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदा अंदाजपत्रके जादा रक्कम दाखवण्यात आली आहे. व निविदा मंजूर करतांना सध्याचा ट्रेड 25 टक्के कमी दराने चालू आहे, पंरतू सदर निविदा 05 ते 10 टक्के बिलो करण्यात आला आहे. यातून शासनाच्या तिजोरीची लूट करण्यात आली आहे. कागदपत्रांमध्ये बोगसगिरी करून या कंपन्यांनी आणि एजन्सींनी निविदा लाटत शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे.  

लातूर सार्व. बांधकाम विभागात कोट्यावधींचा अपहार – लातूर सार्वजनिक बांधकाम विभागात अधीक्षक अभियंता सलीम शेख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत निविदांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे. आपल्या मर्जीतील ठेकेदारांवर विशेष कृपादृष्टी दाखवत, त्यांना आणि आपल्याला कसा आर्थिक फायदा होईल, यादृष्टीने अधीक्षक अभियंता शेख यांनी निविदा काढल्या आहेत. तसेच कार्यकारी अभियंता निळकंठ यांनी देखील अशाचप्रकारे मोठा अपहार करून शासनाच्या तिजोरीची लूट करण्याचा सपाटा लावला आहे.

कंपन्यांनी बोगस कागदपत्रांद्वारे मिळवली टेंडर – पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत 1 हजार 33 कोटींच्या निविदा घेणार्‍या कंपन्या, एजन्सी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ही टेंडर लाटल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कंत्राट घेणार्‍या कंपनीचे किंवा एजन्सीचे तीन वर्षांचा टर्नओव्हर किंवा अर्नेस्ट मनी, तसेच तीन वर्षांचा कॅश फ्लो, तसेच तीन वर्षांचे वर्कडन सर्टिफिकेट या कागदपत्रांमध्ये बोगसगिरी करून या कंपन्यांनी आणि एजन्सींनी निविदा लाटल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे आणि पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांचे अर्थपूर्ण देवाण-घेवाण असल्याशिवाय या निविदांमध्ये भ्रष्टाचार आणि कागदपत्रांमध्ये बोगसगिरी होणार नाही. तसेच या कंपन्यांनी काही कागदपत्रे ही निविदा झाल्यानंतर देखील जोडल्याचे नाकारता येत नाही.

पुणे ब्राम्हण सेवा संघांकडून अनेक तक्रारी – पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराबद्दल ब्राम्हण पुणे संघांकडून अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पुणे शहराचे ब्राम्हण महासंघाचे शहराध्यक्ष मंगेश पंचपोर यांनी देखील या निविदांचे गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित केला आहे.

COMMENTS