Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे आरोग्य अधिकार्‍याचा लेटर बॉम्ब

थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली आरोग्यमंत्र्यांची तक्रार

पुणे : पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी निलंबित केले आहे. या विरोधात डॉ. भगवान पवार या

तब्बल एका दशकानंतर केकेआर अजिंक्य
स्वतंत्र भारत पक्षाने दिले सिंग, पवार व भुसेंना धन्यवाद ; कांदा खरेदी निर्णयाबद्दल कृतज्ञता
लाईफ केअर कार्डीयक सेंटर तर्फे  मोफत हृदय रोग निदान शिबीराचा 400 रुग्णांनी घेतला लाभ

पुणे : पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी निलंबित केले आहे. या विरोधात डॉ. भगवान पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित आरोग्य मंत्री सावंत यांची तक्रार केल्यामुळे खळबळ उडाली आहे. डॉ. भगवान पवार यांचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जुन्या काही प्रकरणावरून निलंबन केले होते. त्यांचे हे निलंबन चुकीचे असल्याचे डॉ. भगवान पवार यांचे म्हणणे असून त्यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. मंत्री महोदयांनी मला कात्रज कार्यालयात बोलावून नियम बाह्य टेंडरची कामे करण्यास सांगितली. इतर खरेदी प्रकरणात दबाव आणला, असा गंभीर आरोप डॉ. पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यांच्या या पत्रामुळे खळबळ उडाली असून या पत्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार या कडे लक्ष लागले आहे. तसेच पवार यांच्या लेटर बॉम्बमुळे पालिकेत देखील चर्चांना उधाण आले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य अधिकारी आणि सध्याचे पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी भगवान पवार यांच्यावर महिला कर्मचार्‍यांचा लैंगिक छळ प्रकरण व आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत त्यांचे राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने निलंबन केले होते.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली आल्याची चर्चा आहे. सध्या त्यांची बदली ही नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात अलायी आहे. या कारवाई नंतर भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून अनेक गंभीर आरोप आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर केले आहे. दरम्यान, या पूर्वी देखील भगवान पवार यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाचा पदभार हाती घेतल्यावर डॉ. भगवान पवार यांची साडेतीन महिन्यात बदली करण्यात आली होती. या बदली विरोधात भगवान पवार हे मॅटमध्ये गेले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा पालिकेत रुजू करण्यात आले होते. भगवान पवार यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी पुणे महानगर पालिकेत वर्षभरापासून कार्यरत आहे. या ठिकाणी माझ्या कामाबाबत कोणत्याही गंभीर तक्रारी नाहीत. तर कोणतही चौकशी देखील झाली नाही. महानगरपालिकेकडून कोणतेही चुकीचे शेरे देखील देण्यात आलेले नाही. तरीसुद्धा माझ्यावर निलंबनाची चुकीची कारवाई करण्यात आली आहे. एक मागासवर्गीय अधिकारी असल्याने अनाई जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली आहे. मंत्री महोदय मला त्यांच्या कात्रजमधील ऑफिसला बोलावून नियमबाह्य टेंडर काढण्यासाठी दबाव टाकत होते. मी हे नियमबाह्य कामे करण्यास नकार दिल्याने. त्यांचा रोष माझ्यावर आहे. या रोषापोटी आणि आकसापोटी माझ्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

COMMENTS