पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील एका तरुणीला ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तब्बल 35 लाख रुपयांचा गंडा घालून फसवणूक करणार्या चोरट्याला सायबर गुन्हे शाखेच्या

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील एका तरुणीला ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तब्बल 35 लाख रुपयांचा गंडा घालून फसवणूक करणार्या चोरट्याला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून अटक केली आहे. तुषार प्रकाश अजवानी (वय-37, रा. वॉटरफोर्ड जुहू लेन, अंधेरी, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी तुषार अजवणी याने एका 32 वर्षीय तरुणीला अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून व्हॉटसअपवर संदेश पाठवला. गुगल टास्क देऊन टेलिग्राम मजकूर, ध्वनिचित्रफितीस दर्शक पसंती (पब्लिक व्ह्यूज) मिळवून दिल्यास अल्पावधीत चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवून आरोपी आणि त्याच्या साथीदारंनी तिला गुंतवणूक जाळ्यात ओढले.सुरवातीला तिच्या बँक खात्यावर किरकोळ रक्कम देऊन विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर तरुणीकडून वेळोवेळी 35 लाख रुपये विविध कारणे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यावर घेतले. त्यानंतर आरोपींनी त्यांचे मोबाइल क्रमांक परस्पर बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. पुणे सायबर पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला. आरोपी मुंबईतील जुहू भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपी तुषारला अटक केली.पोलिस तपासासाठी त्याला येत्या 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले. सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त आर. एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, उपनिरीक्षक सचिन जाधव, अमर बनसोडे, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, सुनील सोनुने आदींनी ही कारवाई केली आहे. ऑनलाइन ज्यादा आमिष देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणार्या गुन्हेगारांपासून नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
COMMENTS