Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात डॉ. शशिकांत अहंकारी यांचे निधन

पुणे/प्रतिनिधी ः प्रसिद्ध समाजसेवक आणि हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचे पुण्यात आज निधन झाले. त्यांना कर्करोग झाला होता.

श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याचे व रामकथेचे आयोजन
Live : राज ठाकरे यांच्या पुणे येथील जाहीर सभेचे थेट प्रक्षेपण
राजस्थानचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माचं निधन

पुणे/प्रतिनिधी ः प्रसिद्ध समाजसेवक आणि हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचे पुण्यात आज निधन झाले. त्यांना कर्करोग झाला होता. डॉ. शशिकांत अहंकारी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूरचे रहिवासी. त्यांच्यावर आज बुधवारी अणदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. शशिकांत अहंकारी यांनी अणदूरमध्येच आपल्या पत्नीसोबत मिळून हॅलो मेडिकल फाऊंडेशनची स्थापना केली होती. दोघे डॉक्टर पती-पत्नी येथे एका रुग्णालयात सेवा देत होते. समाजातल्या तळागाळातील तसेच खेड्यापाड्यातील लोकांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी, या उद्देशाने डॉ. शशिकांत अहंकारी यांनी हॅलो फाऊंडेशनची स्थापना केली होती. डॉक्टरकीची पदवी मिळाल्यानंतर अहंकारी यांनी सुरूवातीला शहरात सेवा दिली. मात्र, आपल्या ज्ञानाचा समाजातील तळागाळातील लोकांना उपयोग व्हावा म्हणून शहरातील आपली फायदेशीर कारकीर्द सोडण्याचा निर्णय घेतला. खेड्यांना अधिक प्रभावी आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळवण्यात मदत करण्यासाठी समर्पित टीमसह 1993 मध्ये हॅलो मेडिकल फाऊंडेशनची सुरुवात केली. हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे काम पूर्व महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात प्रभावीपणे सुरु होते. डॉ. अहंकारी यांच्या हॅलो मेडिकल फाऊंडेशनकडून अनेक अतिरिक्त सेवा दिल्या जातात ज्यात दुय्यम-केअर हॉस्पिटल, आरोग्य विमा, स्वयं-सहायता गट, महिला सक्षमीकरण मंच, शाश्‍वत शेती आणि विज्ञान शिक्षण इत्यादीचा समावेश आहे.

COMMENTS