Homeताज्या बातम्यादेश

पुलवामा दहशतवाद्यांच्या हल्ल्याने हादरले

काश्मिरी पंडिताची गोळया झाडून हत्या

पुलवामा/वृत्तसंस्था : काश्मीर खोर्‍यात पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी रविवारी केलेल्या हल्ल्यात काश्मिरी पंडित स

अरे बापरे…24 जणांना ठोठावला तब्बल 82 कोटींचा दंड…
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रदूषकांमुळे मृत्यू झाले नसल्याचा अहवाल प्राप्त : राज्यमंत्री संजय बनसोडे
अकासा एअर आणि इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा

पुलवामा/वृत्तसंस्था : काश्मीर खोर्‍यात पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी रविवारी केलेल्या हल्ल्यात काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. संजय शर्मा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार पुलवामामध्ये अचन भागात राहणारे संजय शर्मा रविवारी काही कामासाठी बाजारात जात होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. आणि उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 वाजण्याच्या सुमारा एका माणसाची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. संजय शर्मा असं त्यांचं नाव होतं. ते बँकेत काम करत होते आणि त्यांचं वय 40 होते. दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये अल्पसंख्याक असलेल्या काशीनाथ शर्मा यांचा मुलगा संजय शर्मावर गोळी झाडली आणि त्याला ठार केलं. ही घटना घडली तेव्हा संजय शर्मा हे बाजारात चालले होते. गोळी लागलेल्या अवस्थेत पोलीस त्यांना रूग्णालयात घेऊन चालले होते. मात्र वाटेत त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. या घटनेनंतर या ठिकाणी सशस्त्र जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. काश्मीरमध्ये या हत्यांच्या घटना थांबताना दिसतच नाहीत. भारत सरकार जम्मू काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांच्या सुरक्षेच्या बाबतीत सातत्याने अपयशी ठरतं आहे. संजय शर्मा यांच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत या आशयाचं ट्विट मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात काश्मिरी पंडीत पुरण किशन भट या काश्मिरी पंडिताची संशयित दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पुरण किशन भट हा शोपियाँमधल्या गुंड गावातला होता. त्याची हत्या करण्यात आली होती. आता रविवारी पुन्हा एकदा संजय शर्मा या काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात आली आहे. स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेले, मात्र त्याला वाचवता आले नाही.

COMMENTS