कोपरगाव शहर : सातारा येथे पार पडलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोपरगाव येथील बाल कवयित्री रेवती संदीप चव्हाण हिच्या ‘कलाकुंज’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन उत्साहात झाले. कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय, करंजी येथील कलाशिक्षक संदीप चव्हाण यांची कन्या असलेल्या रेवतीच्या या कवितासंग्रहाचे प्रकाशन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांच्या हस्ते झाले.यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बाल वयातच कवितेच्या माध्यमातून संवेदनशीलता, कल्पकता आणि भाषेवरील प्रभुत्व दाखवणाऱ्या रेवतीच्या ‘कलाकुंज’ या कवितासंग्रहाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. तिच्या कवितांमधून निसर्ग, भावविश्व, बालमनाचे सहज भाव आणि संस्कारांचे प्रतिबिंब उमटते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.साहित्यप्रेमी,पालक,शिक्षक आणि रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा अत्यंत प्रेरणादायी व स्मरणीय ठरला. बालसाहित्याच्या क्षेत्रात रेवती संदीप चव्हाण हिची ही वाटचाल भविष्यात निश्चितच उल्लेखनीय ठरेल,असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

कोपरगाव शहर : सातारा येथे पार पडलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोपरगाव येथील बाल कवयित्री रेवती संदीप चव्हाण हिच्या ‘कलाकुंज’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन उत्साहात झाले. कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय, करंजी येथील कलाशिक्षक संदीप चव्हाण यांची कन्या असलेल्या रेवतीच्या या कवितासंग्रहाचे प्रकाशन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांच्या हस्ते झाले.यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बाल वयातच कवितेच्या माध्यमातून संवेदनशीलता, कल्पकता आणि भाषेवरील प्रभुत्व दाखवणाऱ्या रेवतीच्या ‘कलाकुंज’ या कवितासंग्रहाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. तिच्या कवितांमधून निसर्ग, भावविश्व, बालमनाचे सहज भाव आणि संस्कारांचे प्रतिबिंब उमटते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.साहित्यप्रेमी,पालक,शिक्षक आणि रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा अत्यंत प्रेरणादायी व स्मरणीय ठरला. बालसाहित्याच्या क्षेत्रात रेवती संदीप चव्हाण हिची ही वाटचाल भविष्यात निश्चितच उल्लेखनीय ठरेल,असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

COMMENTS