Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’होय मी व्यसनातून मुक्त होणारच’ पुस्तकाचे प्रकाशन

अहमदनगर/प्रतिनिधी ः जागतिक पुस्तक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार विजेते झुंबरराव खराडे यांनी लिहिल

नगरची भाजप बांधली राष्ट्रवादीच्या दावणीला? ;प्रदेशाध्यक्ष पाटील आज दखल घेण्याची शक्यता
एसटी बस आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात तिघांचा मृत्यू
आता विश्‍वात्मके देेवे…गृहिणीने हाताने लिहिली ज्ञानेश्‍वरी.

अहमदनगर/प्रतिनिधी ः जागतिक पुस्तक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार विजेते झुंबरराव खराडे यांनी लिहिलेल्या ’होय मी व्यसनातून मुक्त होणारच’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगण पार पडला.
    व्यसनमुक्तीचे काम करणे अतिशय अवघड आहे परंतू समाजाची आजच्या काळातील ती गरज असून त्यासाठी काम करणे गरजेचे आहे. खराडे यांचे हे पुस्तक समाजासाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे गौरवोद्गार हजारे यांनी काढले. तसेच व्यसनमुक्तीचे कार्य करणारे समाजाची खर्‍या अर्थाने सेवाच करतात असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी श्रीराम विद्यालय पिंपळगाव माळवीचे माजी प्राचार्य ज्ञानदेव खराडे, अहमदनगर आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रमप्रमुख बाबासाहेब खराडे, भाजप कामगार आघाडीचे नगर तालुका अध्यक्ष नारायण कुलांगे, राळेगण म्हसोबा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन विश्‍वनाथ खराडे, जालिंदर खेडकर, शाम काठे, दिलीप छबुराव खराडे, व्यसनमुक्तीचे प्रचारक दत्ता साठे, पठाडे आदि उपस्थित होते.

COMMENTS