Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्ते सुरक्षामध्ये लोकसहभाग सुनिश्‍चित करावा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

नागपूर ः नागपुरातील जिल्हाप्रशासन, वाहतूक यंत्रणा तसेच सर्व  रस्ते बांधणी संस्थांनी रस्ते अपघात प्रतिबंधाविषयी समन्वय साधून सेव लाईफ  फाउंडेशन या

शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज ः नितीन गडकरी
मुंबई देशाच्या आर्थिक विकासाचा केंद्र बिंदू – गडकरी
गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्याची देशभरात चर्चा

नागपूर ः नागपुरातील जिल्हाप्रशासन, वाहतूक यंत्रणा तसेच सर्व  रस्ते बांधणी संस्थांनी रस्ते अपघात प्रतिबंधाविषयी समन्वय साधून सेव लाईफ  फाउंडेशन यासारख्या स्वयंसेवी संस्थांनी अपघात प्रवण स्थळांची सुधारणा करण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजना राबविल्या पाहिजे. स्वयंसेवी संस्थांच्या सोबत प्रशासनाने देखील काम करून लोकांना रस्ते सुरक्षा संदर्भात  जागरूक करण्यासाठी रस्ते सुरक्षा क्षेत्रात लोकसहभाग वाढवण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये केले.
ते आज स्थानिक रवी भवन सभागृहात नागपूर झीरो फॅटलिटी डिस्ट्रिक्ट रिव्यू आणि जिल्हा रस्ते सुरक्षा समिती बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, नागपूर ग्रामीणचे पोलीस अध्यक्ष डॉ. हर्ष पोद्दार उपस्थित होते. याप्रसंगी सादरीकरण करताना रस्ते सुरक्षा क्षेत्रात कार्य करणार्‍या’ सेव लाईफ’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष  प्रविण तिवारी यांनी नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहरात घडलेल्या रस्ते अपघातांची तसेच त्यावर संबंधित यंत्रणेला सुचवलेल्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. नागपूर ग्रामीणमध्ये  मागील वर्षी 440 जणांना आपला प्राण रस्ते अपघातात गमवावा लागला. यावर्षी या अपघाताच्या संख्येत 4 टक्के घट झाल्याची तसेच नागपूर शहरामध्ये 308 मृत्यू हे मागच्या वर्षी झाल्याची  माहिती सुद्धा त्यांनी दिली. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला त्वरित वैद्यकीय मदत मिळण्यासाठी म्बुलन्सच्या आतच अपघातग्रस्त वाहनातून  वाहनाचे  भाग कापून जखमींना बाहेर काढण्यासाठी तसेच त्वरित वैद्यकीय मदत घटनास्थळीच मिळण्यासाठीचा एक प्रशिक्षित कर्मचारी वर्ग हा त्वरित उपलब्ध करून देण्यासाठीची यंत्रणा  वैद्यकीय विभाग, पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वय साधून  तयार करावी जेणेकरून अपघातानंतरच्या गोल्डन आवर मध्ये अपघातग्रस्तांचा जीव वाचेल अशी सूचना गडकरींनी  केली. सार्वजनिक बांधकाम विभागाला सेव लाईफ फाउंडेशनने जे 57 अपघात प्रवण स्थळे मध्ये सुधारणा सुचवल्या होत्या त्यामध्ये काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग  निवीदा  प्रक्रिया पूर्ण करून ते लवकरच चालू करेल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भानुसे यांनी स्पष्ट केले.  वर्दळीच्या रस्त्यावर  फुट ओवर ब्रिजच्या माध्यमातून दुचाकी तसेच शालेय विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना रस्ता पार करण्यासाठीच्या सुविधेची सुद्धा चाचपणी यंत्रणांनी करावी. शहरातील  फुटपाथ मोकळे नसल्यामुळे खूप अपघात होतात. त्यामुळे अशा फुटपाथ वरील अतिक्रमण पोलिस संरक्षणात कडक कारवाईने  मोकळे करून  तसेच ज्या फुटपाथवर पक्के बांधकाम आहे ते सुद्धा काढून टाकण्याचे निर्देश गडकरी यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले. पार्किंगच्या नियमांची धास्ती लोकांना व्हावी याकरिता नो पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे निर्देशही वाहतूक पोलिसांना  डकरींनी यावेळी दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आंचल गोयल यांनी महानगरपालिकेला सेव्ह लाईफ फाउंडेशनने जे 40 अपघात प्रवण स्थळ सुधारणा सुचवले होते त्यामध्ये महानगरपालिकेद्वारे दिशादर्शक फलक तसेच रोडवरील मार्किंग, रेलिंग याद्वारे सुधारणा करण्यात आल्याची माहिती दिली. ज्या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी रस्ते सुरक्षा संदर्भात शिबिर घेऊन तसेच ते रोड वाहतुकीसाठी सुलभ करण्यात आले आहेत असे देखील  गोयल यांनी सांगितले. शहरातील नवीन सिमेंट प्रकल्पात देखील वाहनाच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे असे  महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. या बैठकीस पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य उपस्थित होते.

COMMENTS