पबजीचे व्यसन ; मुलाने केली आईसह तीन भावडांची हत्या

Homeताज्या बातम्यादेश

पबजीचे व्यसन ; मुलाने केली आईसह तीन भावडांची हत्या

लाहौर/वृत्तसंस्था : व्यसनाचा अतिरेक झाला तर काय होते, याचे अनेक परिणाम समोर आले आहेत. त्यातच युवा वर्गाला ऑनलाईन गेमचे मोठे व्यसन लागल्याचे दिसून येत

स्थानिक स्वराज्य संस्थांत आता शिवस्वराज्य दिन
ड्रीम्स मॉल आगीचा चौकशी अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत
काँग्रेसने निदर्शने करून भारत बंदला दिला पाठिंंबा

लाहौर/वृत्तसंस्था : व्यसनाचा अतिरेक झाला तर काय होते, याचे अनेक परिणाम समोर आले आहेत. त्यातच युवा वर्गाला ऑनलाईन गेमचे मोठे व्यसन लागल्याचे दिसून येत आहे. ‘पबजी’च्या व्यसनाचे अनेक किस्से आतापर्यंत तुम्ही ऐकले असतील. या गेमचे व्यसन अनेकाच्या जीवावर बेतले आहे. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात ‘पबजी’च्या व्यसन जडलेल्या 14 वर्षीय मुलाने कहरच केला. त्याने आपल्या आईसह तीन भावडांची गोळ्या घालून हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
या धक्कादायक घटनेबाबत माहिती देताना लाहौर पोलिसांनी सांगितले की, लाहौरमधील काहना परिसरातील आरोग्य कर्मचारी नाहिदा मुबारक, त्याच्या मुलगा तैमूर ( वय 22), 17 व 11 वर्षांच्या दोन मुली यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हल्ल्यात त्यांचा 14 वर्षीय मुलास कोणतीही दुखापत झाली नव्हती.पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला असता 14 वर्षीय मुलाने कुटुंबातील सर्वांची गोळ्या झाडून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. मुलाला पबजी गेमचे व्यसन जडले होते. सतत ऑनलाईन गेम खेळत असल्याने त्याला मानसिक विकारांनी घेरले होते. नाहिदा मुबारक यांचा घटस्फोट झाला होता. त्या आपल्या मुलांसह वेगळ्या राहत होत्या. सतत पबजी गेम खेळत असल्याने नाहिद आपल्या मुलास रागवत असत. गोळीबाराची घटना घडली त्या दिवशीही नाहिद यांनी मुलाला रागवल्या होत्या. यानंतर मुलाने घरात असणार्या बुंदकीतून गोळ्या झाडात आईसह तीन भावडांची हत्या केली. मुलाने आईसह तीन भांवडाच्या गोळ्या झाडून ह्त्या केली. यानंतर तो रात्री झोपी गेला. सकाळी त्याने आरडाओरडा करत शेजार्यांना उठवले. मी घरातील वरच्या मजल्यावर होतो. त्यामुळे कुटुंबातील सर्वांची हत्या कशी झाली? याची माहिती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला. तपासात नाहिद यांनी आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी पिस्तुल खरेदी केले होते. या पुस्तलाचे लायसनही त्यांच्याकडे होते, अशी माहिती समोर आली. तसेच याच पिस्तुलातून अल्पवयीन मुलाने आईसह तिन्ही भावडांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.

COMMENTS