कोपरगाव शहर प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील ज्या सहकारी पतसंस्थांची जंगम जप्ती, स्थावर जप्ती यासारख्या थकबाकी वसुलीसाठी पोलीस संरक्षण मिळत नाही.
कोपरगाव शहर प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील ज्या सहकारी पतसंस्थांची जंगम जप्ती, स्थावर जप्ती यासारख्या थकबाकी वसुलीसाठी पोलीस संरक्षण मिळत नाही. त्या सहकारी पतसंस्थांना थकबाकी वसुलीसाठी पोलिस बंदोबस्त मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी संघ अध्यक्ष सुरेश वाबळे, संचालक शिवाजी आप्पा कपाळे आदींनी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशजी ओला यांना निवेदन देत केली.
29 जानेवारी 2019 च्या शासन परिपत्रक क्र.याचिका-0119/01/ प्र. क्र. वि शा-अनुसार जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींसोबत थकबाकी वसुलीत येणार्या अडी अडचणी बाबत दर तीन महिन्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने बैठक घेण्यात यावी. वसुलीच्या मोठ्या कर्ज प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा करण्यात यावा. ज्या कर्ज प्रकरणांमध्ये पतसंस्थांना पोलीस संरक्षण आवश्यक असल्यास ते देण्यात यावे, असे सांगितले आहे. तसेच जिल्ह्यातील ज्या सहकारी पतसंस्थांना थकबाकी वसुलीसाठी पोलीस संरक्षण लागत असेल किंवा वसुलीबाबत इतर काही अडचणी असल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी संघ यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांना केले.
अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांची थकबाकी वसुलीला संरक्षण मिळावे या विषयी लवकरात लवकर बैठक घेण्यात येईल. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील ज्या ज्या सहकारी पतसंस्थांना थकबाकी वसुलीसाठी पोलीस संरक्षण पाहिजे असेल त्यांना पोलीस संरक्षण देण्यात येईल.
राकेश ओला, जिल्हा पोलीस अधीक्षक
COMMENTS