आंदोलनकर्त्या एसटी वाहकाचा नगरमध्ये हृदयविकाराने मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंदोलनकर्त्या एसटी वाहकाचा नगरमध्ये हृदयविकाराने मृत्यू

अहमनगर/प्रतिनिधी : एसटी महामंडळाच्या कल्याण डेपोमध्ये वाहक म्हणून कार्यरत असलेले विजय महादेव राठोड (वय 46, राहणार बुर्‍हाणगर, ता. नर) यांचा रविवारी (

नरहरी सेनेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात
जिल्ह्याला कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचे पुरेसे डोस तातडीने द्यावेत
ट्रॅक्टर मेकॅनिकचा मुलगा झाला सी.ए. परीक्षा उत्तीर्ण

अहमनगर/प्रतिनिधी : एसटी महामंडळाच्या कल्याण डेपोमध्ये वाहक म्हणून कार्यरत असलेले विजय महादेव राठोड (वय 46, राहणार बुर्‍हाणगर, ता. नर) यांचा रविवारी (14 नोव्हेंबर) दुपारी हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राठोड यांच्यामागे पत्नी, बहीण, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, राठोड यांनी गेल्या पाच दिवसापासून घरामध्ये आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण केले होते. नगर येथील बुर्‍हाणनगर भागामध्ये विजय राठोड हे आपल्या कुटुंबासह अनेक वर्षापासून राहत आहेत. कल्याण डेपोमध्ये ते वाहक म्हणून कार्यरत होते. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जी काही सेवा केली होती, त्याचा मोबदला त्यांना मिळालेला नव्हता. घरची परिस्थिती अतिशय गरीब असल्यामुळे मुलाबाळांचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्‍न त्यांच्या कुटुंबाससमोर उभा ठाकलेला होता. त्यातच गेल्या तीन महिन्यापासून त्यांना पगार मिळालेला नव्हता व ते तेव्हापासूनच अस्वस्थ होते. ज्या वेळेला राज्यात एसटी कर्मचार्‍यांनी बंद पुकारला होता, त्या बंदच्या संदर्भामध्ये पाठिंबा देण्यासाठी सुरुवातीला तारकपूर येथील एसटी डेपोमध्ये जाऊन त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांच्या घरी त्यांनी आंदोलन सुरू केले होते. गेल्या पाच दिवसापासून त्यांनी काही अन्न घेतलेले नव्हते, असे मुलाने सांगितले. त्यांची रविवारी दुपारी तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. या संदर्भामध्ये कॅम्प पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. राठोड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला होता. यासंदर्भात पोलिस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, राठोड यांचा मुलगा अभिषेक याने सांगितले की, आमची परिस्थिती अतिशय गरीब आहे. तीन महिन्यापासून वडिलांना पगार नव्हता. दिवाळीसुद्धा आम्ही कशीबशी साजरी केली. आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली.

COMMENTS