Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुतळा दुर्घटनेप्रकरणी कोपरगावात मविआच्या वतीने निषेध

कोपरगाव शहर ः अवघ्या सात महिन्यापूर्वी राज्यसरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती

जागतिक पातळीवर नगरचा झेंडा फडकवताना नगरी नगरकरांना मायभूमीच्या ऋणातून उतराई होण्याचा ध्यास-पदमश्री पोपटराव पवार
पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने मुन्नाभाई फरार
आदिवासींच्या विकासासाठी 8.81 कोटींचा निधी मंजूर

कोपरगाव शहर ः अवघ्या सात महिन्यापूर्वी राज्यसरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा घाईघाईने स्थापित करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मोठ्या जल्लोषात उद्घाटन केले होते. परंतु दोन दिवसापूर्वी हा पुतळा कोसळण्याची घटना घडली असून त्यामुळे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची विटंबना झाली असून या दुर्दैवी घटनेत जबाबदार असलेल्या राज्य सरकारच्या कृतीचे निषेधार्थ कोपरगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत राज्यपालांना निवेदन पाठवत शासनाचा कृतीचा निषेध व्यक्त केला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते अँड.संदीप वर्पे, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शिवसेना शहर प्रमुख सनी वाघ, माजी शहर प्रमुख कलविंदर डडियाल,भरत मोरे, माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, काँग्रेसचे तुषार पोटे, , प्रफुल्ल शिंगाडे, किरण खर्डे,भावेश थोरात, सुनील वर्पे, निखिल थोरात, विकास शर्मा, मनोज शेठ, ओंकार वढणे, संकेत वाघमारे, अल्ताफ शेख,रवी कथले, काल्लूआप्पा आव्हाड, सिद्धार्थ शेळके, छोटू बोराडे, आशिष निकुंभ,संकेत वाघमारे आदी कोपरगाव तालुका व शहरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोपरगाव तालुका व शहर महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या व नागरिकांच्या मनाला प्रचंड वेदना झाल्या असून आम्ही या निवेदनाद्वारे आपणास विनंती करतो की छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणी मध्ये मोठा भ्रष्टाचार करत पुतळा उभारला परंतु सदर पुतळा सात महिन्यात पाडण्यास कारणीभूत ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजप नेते रवींद्र चव्हाण यांचा तत्काळ राजीनामा घेऊन महायुतीचे महाराष्ट्र सरकार त्वरित बरखास्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपालना निवेदन देत करण्यात आली आहे.

COMMENTS